24 November 2024 2:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

भाजपच्या मागे जाणारे मतदारच नालायक: प्रकाश आंबेडकर

BJP, Prakash Ambedkar, Maharashtra Vidhansabha Election 2019

अकोला: भारतीय जनता पक्षाच्या मागे जाणाऱ्या मतदारांना नालायक नाही तर काय म्हणायचे, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते बुधवारी अकोला क्रिकेट मैदानावर भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मतदान करणाऱ्या नागरिकांविषयी संताप व्यक्त केला. मतदार नालायक वागतो म्हणून शासन बेफाम वागते, असे त्यांनी म्हटले.

विशेष म्हणजे आपल्या भाषणात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख टाळत विरोधकांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पडद्यामागे आंबेडकरांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली का, अशी चर्चा रंगली आहे. आंध्र प्रदेशातील संघप्रचारकाने देशातील बाँबस्फोटांमध्ये संघाचा सहभाग असल्याचा आरोप केला. मात्र, सरकार गप्प का, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात लपवलेल्या गुन्ह्यांविषयी माध्यमांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले. यावेळी आंबेडकरांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये साटेलोटे असल्याचाही आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल असताना त्यांना अटक कशी होत नाही? यामध्ये भारतीय जनता पक्ष-काँग्रेसमध्ये साटलोटे आहे का?, असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीमुळे काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर विरोधकांनी वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आरोपही केला होता. विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला अवघ्या ४० जागा देऊ, अशी भूमिका घेतल्यामुळे ही युती प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या आग्रही भूमिकेमुळे एमआयएमनेही वंचितची साथ सोडली होती.

दरम्यान मागील ३२ वर्षे अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरु आहे. एकच नेता, विशाल मिरवणूक, प्रचंड प्रतिसाद,ओसंडून वाहणारा उत्साह, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे,विविध झाक्या, हजारोचा स्वंयशिस्त समूह, कमालीचे आज्ञाधारी कार्यकर्ते, वर्षागणीक वाढत जाणारी गर्दी, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, आणि महाराष्ट्राला राजकीय सामाजिक दिशा देणारी जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता…अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ९ ऑक्टोबर २०१९ रोजी हया वर्षीचा धम्म मेळावा आयोजित केला गेला होता. तसेच अकोला रेल्वे स्टेशन ते क्रिकेट क्लब मैदाना पर्यत जंगी मिरवणूक काढली गेली.

भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त परिश्रमाने अ‍ॅड.. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर “अकोला पॅटर्न“ जन्माला घालण्यात ह्या “विशाल मिरवणूक व जाहीर सभांचा“ सिंहाचा वाटा राहिला आहे. तीन पिढ्यातील बदल अनेक बदल अकोला जिल्ह्याने या निमित्ताने पाहिलेत. परंतु अगदी पहिल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्या पासूनच आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले एड. बाळासाहेब आंबेडकर हेच या वर्षी देखील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण राहिले.सलग ३२ वर्षे असाच पायंडा आणि आकर्षण असलेला हा सोहळ्याच्या आयोजनाचा इतिहास नव्या पिढीला कळावा त्यासाठी देखील जनजागृती केली जाते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x