22 November 2024 2:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

नवी मुंबई: शिवसेनेतील अंतर्गत वादातून स्वकीयांना जीवे मारण्याच्या धमक्या

Navi Mumbai Shivsena, Vijay Chaugule, Pravin Mhatre

नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना अनेक शहरांमध्ये पक्षातील अंतर्गत वाद टोकाला जाताना दिसत आहेत. त्यात नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सेनेच्याच पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.

काल संध्याकाळी ऐरोली येथे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पक्षांतर्गत राजकीय बैठक बोलवली होती. मात्र सदर बैठक शिवसेनेची अधिकृत नसल्याचे इतर पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यावरून शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी त्या बैठकीच्या बाबतीत स्थानिकांना माहिती देण्यासाठी स्वतः मेसेज तयार करून ते शिवसेनेच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केले होते. मात्र त्यानंतर संतापलेल्या विजय चौगुले यांनी त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवीण म्हात्रे यांना फोन केला होता. त्यादरम्यान दोघांमध्ये वादविवाद वाढत शाब्दिक चकमक उडाली आणि त्यानंतर संतापलेल्या विजय चौगुले प्रवीण म्हात्रे यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार म्हात्रे यांनी कोपरखैरणे पोलीस स्थानकात केली आहे.

पोलिसांकडे तक्रार केली असता विजय चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यासंदर्भात विजय चौगुले यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, तसेच प्रवीण म्हात्रे यांनी केलेला दावा खोडून देखील काढला नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x