24 November 2024 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन
x

ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है

Ganesh chukkal, ram kadam, ghatkopar constituency, maharashtra assembly elections 2019

मुंबई: सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सभा, प्रचार, रुसवे, फुगवे, मनधरणी या सगळ्याच गोष्टी सगळ्याच पक्षात सुरु आहेत. प्रत्येक पक्ष हा आपल्या विरोधकांवर चांगलाच लक्ष ठेऊन आहे. त्यात सोशल मीडियाने तर अक्षरशः धुमाकूळच घातला आहे, अफवा पसरवणे किंवा कोणाची तरी बदनामी करणे हे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज शक्य झाले आहे.

असाच काहीसा प्रकार घाटकोपर मतदार संघात घडला आहे. दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरमधील मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी काही शिवसैनिक देखील उपस्थित होते. मात्र चुक्कल यांनी पुष्पहार अर्पण करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच “ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है” असं कॅप्शन लिहून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलं.

हि पोस्ट व्हायरल होताच मतदार संघात एकच गोंधळ उडाला आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना त्याची उत्तरं द्यावी लागली. काही दिवसांपूर्वी जेव्हा युतीची घोषणा झाली त्यावेळी एका शिवसैनिकाने घाटकोपर मध्ये बॅनर लावून १ संदेश देण्याचा प्रयत्न केला “साहेब माफ करा, पण यावेळी आमचं मतं राज ठाकरेंच्या मनसेला”. या बॅनरबाजीमुळे देखील लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं.

युतीधर्मानुसार घाटकोपरची जागा हि भाजपचे कार्यसम्राट आमदार राम कदम लढवत असून ते या सगळ्या घटनांमुळे चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. या घटनेनंतर राम कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच शिवसेना भाजपसोबत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तर शिवसैनिकांकडून गणेश चुक्कल यांच्याविरुद्द तक्रार करण्यात आली. त्यानंतर गणेश चुक्कल यांच्याकडून संबंधीत फेसबूक पोस्ट डिलीट करण्यात आली.

परंतु गणेश चुक्कल यांच्यामते शाखाप्रमुखांच्या परवानगीनंतरच आम्ही शिवसेना कार्यालयात गेलो होतो. शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात गैर काय, असा सवाल चुक्कल यांनी यावेळी उपस्थित केला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x