22 November 2024 6:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

मोदीजींच्या राज्यात शेतकरी चिंतेत आणि उद्योगपती मजेत - राहुल गांधी

Rahul gandhi, Narendra Modi, Maharashtra Vidhansabha Election 2019

औसा: उद्योगपतींचं साडेपाच लाख कोटींचं कर्ज माफ झालं. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का? मोदी, शहा मूळ प्रश्नांवरून जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीसाठी औसामधील पहिल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्रातील काँग्रेसमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात काँग्रेसची पाळमुळं रुजली आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा यामुळे राहुल गांधी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार का? अशी शंका उपस्थित केली जात होती. पण राहुल गांधी यांनी शेतकरी, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांना लक्ष्य करत औसातील पहिली प्रचारसभा दणकावून सोडली.

मोदींच्या राज्यात शेतकरी चिंतेत आहे. बँकांचं कर्ज कसं फेडायचं याची चिंता त्याला सतावत आहे. मात्र मोदींचे मित्र असलेले उद्योगपती मजेत आहेत. कर्ज बुडवलं तरी आपण परदेशात पळून जाऊ शकतो, असा ठाम विश्वास त्यांच्या मनात आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवरुन लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीच कलम ३७०चा उल्लेख केला जात असल्याचं देखील ते म्हणाले. लातूरमधील औसामध्ये ते पक्षाच्या प्रचारसभेत बोलत होते.

तुमची कर्जमाफी झाली का? पिकाला चांगला भाव मिळतोय का? अच्छे दिन आले का?, असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले. मोदींनी त्यांच्या उद्योगपती मित्रांचं साडे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. अंबानी, अदानी यांनी घेतलेलं कर्ज माफ करून टाकलं. मोदींनी त्यांच्या मित्रांना दिवाळी गिफ्ट दिलं. पण सर्वसामान्य शेतकऱ्याला काय मिळालं?, असा प्रश्न राहुल यांनी विचारला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x