23 November 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

PMC बँक: नोटबंदीप्रमाणेच लोकांचे जीव जात आहेत; पण मोदी सभेत भाष्य करणार का?

PMC Bank, PMC bank Fraud, RBI, Punjab and Maharashtra Co Operative bank

मुंबई: घोटाळ्याच्या विळख्यात अडकलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यानंतर या बँकेच्या प्रामाणिक खातेदारांवर मोठा आघात झाला असून आपली आयुष्याची कमाई बुडाल्याच्या भीतीने खातेधारक व त्यांचे कुटुंबीय गलितगात्र झाले आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या दोन दिवसांत या बँकेच्या दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या संकटाला वेगळंच वळण लागलं आहे.

पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत खाते असलेले ग्राहक संजय गुलाटी यांचा सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला २४ तासही उलटत नाहीत तोच आज दुपारी मुलुंड येथील ६१ वर्षीय खातेधारक फट्टोमल पंजाबी यांना मृत्यूने गाठले. बँकेवरील निर्बंधांमुळे प्रचंड तणावाखाली असलेल्या फट्टोमल यांना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या गोकुळ रुग्णालयात नेले मात्र तिथे तपासणी केली असता त्यांचे आधीच निधन झाल्याचे स्पष्ट झाले. फट्टोमल हे आज बँकेत जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. फट्टोमल यांना विकास आणि गीता (विवाहित) अशी दोन मुलं असून मार्च महिन्यात पत्नीचं निधन झाल्यानंतर ते घरात एकटेच राहत होते, असे त्यांचे बंधू दीपक पंजाबी यांनी सांगितले.

मुलुंड येथील फत्तेमुल पंजाबी यांचा स्वत:चा व्यवसाय होता. पीएमसीच्या प्रकरणानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आगामी निवडणुकीत ‘मतदान करू नका’ असे लिहून निषेध व्यक्त केला होता. गेले काही दिवस कौटुंबिक अडचणी आणि पीएमसीत अडकलेल्या रकमेमुळे ते सतत चिंतेत असायचे, असे फत्तेमुल यांचे परिचित गुरजीत यांनी सांगितले.

खातेदार डॉक्टरची आत्महत्या वर्सोवा येथे डॉ. योगिता बिजलानी यांनी मंगळवारी संध्याकाळी औषधांचे अतिरिक्त सेवन करून आत्महत्या केली. डॉ. बिजलानी यांचे पीएमसी बँकेत खाते असून त्यामध्ये एक कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारणामुळेच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले का, याबाबत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. बिजलानी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतून मुंबईत माहेरी आल्या होत्या. त्यांनी अमेरिकेतही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले.

सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तर, काही ठिकाणी युतीमध्ये आपसातच तुंबळ सुरू आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र यांच्या आज एकूण ३ सभा होणार असल्या तरी ते सत्ताधारी म्हणून पीएमसी बँकेच्या बाबतीत कोणताही भाष्य करतील अशी शक्यता नसल्याचंच दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x