22 November 2024 12:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला; निंबाळकर सुखरुप

MP Omraje Nimbalkar, Pawanraje Nimbalkar, Osmanabad, Padmasinha Patil, Rana Padmasinha Patil

उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे भर प्रचार सभेत चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. ओमराजे निंबाळकर प्रचार करत असताना एका युवकाने त्यांच्याशी येऊन हात मिळवला आणि नंतर दुसऱ्या हाताने त्यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र निंबाळकर यांनी आपल्या हाताने हा हल्ला अडवला. यामध्ये त्यांच्या हाताला जखम झाली असून हल्ला करणारा तरूण फरार झाला आहे. दरम्यान जखमी निंबाळकर यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

या हल्ल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वतः ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “माझ्या हाताला थोडी दुखापत झालेली आहे. मात्र मी सुखरुप आहे. माझ्या वडिलांप्रमाणेच माझ्यावर कुणीतरी हल्ला केला असावा, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. गेले अनेक दिवस माझा पाठलाग होत असल्याचा मला संशय आहे. हल्ला करणारा तरुण हा कोण होता हे माहिती नाही. या घटनेने आपल्यालाही धक्का बसला आहे. आपल्या वडिलांचीही अशाच प्रकारे हत्या झालीय. मात्र आपल्यावर झालेल्या हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे. मी सुखरुप आहे. पण हा हल्ला कशामुळे केला गेला. यामागे कोण आहे. याची आपल्याला कल्पना नाही. गेल्या दोन दिवसांपासून प्रचारासाठी फिरतोय. काही प्रचारसंभांमध्ये जाणूनबुजून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला, असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हल्ल्यांच्या घटनेनंतर सांगितलं.

याबाबत बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, प्रचारासाठी मी नायगाव पाडोळी येथे गेलो असताना गर्दी जमली, या गर्दीतून तो तरुण माझ्याकडे आला. त्याने त्याचा एक हात माझ्या हातात मिळविला त्यानंतर दुसऱ्या हातात चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राहून मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला किरकोळ जखम झाली. मी सध्या सुखरुप आहे असं त्यांनी सांगितले.

तेरणा सहकारी साखर कारखान्याचे थकबाकी राहिली आहे यातून हा हल्ला झाला असावा असं बोललं जातं मात्र तेरणा साखर कारखान्याची थकबाकी राहिली नाही. सर्व पैसे दिलेले आहेत त्यामुळे ही माहिती चुकीची आहे. गेल्या २-३ सभेत असचं कोणाला तरी पाठवून सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत होता. यामागे कोण आहे याचा अंदाज आता बांधू शकत नाही. मात्र हल्लेखोर सध्या फरार आहे. याबाबत पोलीस तक्रार केली आहे. तपासानंतर या सगळ्यांचा पाठपुरावा करुन योग्य ती माहिती समोर येईल असं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x