चार हाडांचा BMC चोर आज कोकणात आला होता आणि परत गेला: निलेश राणे

मुंबई: माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका करत चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता असा टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांची बुधवारी कणकवलीत प्रचारसभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मित्राच्या घरी चोर शिरल्याने भाजपाला सावध करायला आलो आहे अशा शब्दांत राणे यांच्या कुटुंबावर हल्ला केला होता. आमची लढाई भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाही, तर या परिसरातील खुनशी प्रवृत्तीविरुद्ध आहे असंही यावेळी त्यांनी म्हटलं होतं.
निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं असून ट्विट केलं आहे. “चार हाडांचा BMC चोर आज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू,” असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
चार हाडांचा BMC चोर आज कोकणात आला होता आणि परत गेला. बाकीचं लवकरच बोलू.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 16, 2019
नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेने त्यांच्या उमेदवारीला आव्हान देत सतीश सावंत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे कोकणात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा वाद पेटला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी कणकवलीत झालेल्या प्रचारसभेमध्ये नारायण राणे आणि कुटुंबीयांवर जोरदार टीका केली होती. ”राणे जिथे जातील त्या पक्षाची वाट लावतील. करून करून भागले आणि देवपूजेला लागले, अशी त्यांची अवस्था झाली आहे. शिवसेनेत होते त्यांना काढलं, काँग्रेसमध्ये होते त्यांना काढलं, आता शेवटचा पर्याय आहे, हा लढा सुसंस्कृत विरुद्ध खुनशी प्रवृती असा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवली इथं सभा घेत नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राणे काँग्रेसमध्ये गेले तेव्हा सोनियांना मी शुभेच्छा दिल्या होत्या, तशाच शुभेच्छा आज भाजपला देतोय. पण तुमच्याकडे ही प्रवृत्ती असता कामा नये. युतीतला हा मीठाचा खडा वेळेतच बाजूला करू, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यावर आता नारायण राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘मी अशा गोष्टी कधी पचवत नाही. पचवणार पण नाही. माहिती घेतो आणि बोलतो,’ असं नारायण राणे म्हणाले आहेत. या प्रतिक्रियेतून राणे यांनी भविष्यातही शिवसेनेविरुद्धचा संघर्ष आक्रमकपणे करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राणेंच्या भाजपप्रवेशानंतरही शिवसेना आणि त्यांच्यातील वाद मिटणार नसल्याचं दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE