22 November 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

पीएमसी बँक खातेदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका; याचिकेवरील सुनावणीस नकार

PMC Bank, RBI, Punjab and Maharashtra Co Operative Bank, HDIL

नवी दिल्ली: पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हवालदिल झालेल्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पीएमसी बँकेवर निर्बंध आणण्यात आले असून पैसे काढण्यावर मर्यादा आणण्यात आली आहे. यामुळे अनेक खातेधारक चिंताग्रस्त असून धक्क्याने दोन खातेदारांचा मृत्यूदेखील झाला आहे. काही खातेदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका करत पैसे काढण्यावर मर्यादा आणणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने आधीच चिंताग्रस्त असणाऱ्या खातेदारांच्या चिंतेत भर टाकली असून दिलासा देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळ्यात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेच्या नोंदीत १०.५ कोटींची नोंद नसल्याचं तपास पथकानं म्हटलं आहे. एचडीआयएल आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी दिलेले धनादेश पथकाच्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे हे धनादेश कधीच बँकेत जमा न करता रोख रक्कम देण्यात आली. त्याशिवाय हा घोटाळा ४ हजार ३५५ कोटी रुपयांचा नसून तब्बल ६ हजार ५०० कोटींचा असल्याचंही समोर आलं आहे.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्याची तपासणी करणाऱ्या पथकाला मिळालेल्या धनादेशांची एकूण किंमत १० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच अंदाजे ५० लाख रुपयांचा हिशोब नाही. याशिवाय बँकेतील घोटाळ्याची रक्कम २ हजार कोटींनी वाढली आहे. आता ती ६ हजार ५०० कोटी रुपये इतकी झाली आहे.

हॅशटॅग्स

#Banks(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x