29 April 2025 9:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 30 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
x

मतमोजणी केंद्राजववळ जॅमर बसवून मोबाईल टॉवर बंद ठेवा: धनंजय मुंडे

EVM, EVM hacking, Ballet Paper, Strong Room, Dhananjay Mundey, Pankaja Mundey, Maharashtra Vidhansabha Election 2019

बीड: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून देखील विजयी होण्याचे दाखले देण्यात येत आहेत. भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपच्या जवळपास ४० जागांवर विरोधकांशी तगडा सामना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे जवळपास ६ मंत्री सध्या पराभवाच्या छायेत असल्याचं म्हटलं जातं आहे.

मराठवाड्यातील परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वांचं लक्ष वेधत असल्याने या जागेवर दुसऱ्यांदा इतिहास लिहिला जाणार असल्याचं राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे. स्वतः राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे मैदानात उतरले असून त्यांचं देखील या मतदारसंघात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांना तगडं आवाहन निर्माण झालं आहे. दोन्ही बाजूने आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील शक्ती पणाला लागली असून, जोरदार प्रचार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र सत्ताधाऱ्यांवर आधीच ईव्हीएम’बाबत गंभीर आरोप असल्याने विरोधक कोणताही धोका पत्करण्यास राजी नाहीत असंच म्हणावं लागेल. त्याचाच भाग म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांभोवती जॅमर बसवावा, तसंच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मागील काही निवडणुकांपासून देशात ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड होत असल्याचा आरोप होत आहे, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती आहे. निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता कायम रहावी, या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे विनंती करण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या