25 November 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
x

पिंपरीत बोगस मतदान करणाऱ्या ५ परप्रांतीयांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

maharashtra vidhansabha election 2019, Pimpari Constituency, Fake Voters, Bogus Voters

पिंपरी: आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे मतदानाला देखील खूप कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर वीज नसल्याने मेणबत्या लावून मतदान प्रक्रिया पार पडली जाते आहे. अजून थोडया वेळाने नेमक्या प्रतिसादाचा अंदाज येईल असं निवडणूक कर्मचारी मत व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पक्ष कार्यकर्ते बूथवर मतदाराला आणत असले तरी आता काही गैरप्रकार घडण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त आहे. निवडणुकीपूर्वीच अनेक मतदासंघात बोगस मतदान कार्ड असल्याचं निदर्शनास आणण्यात आलं होतं, तरी त्यातील अनेक त्रुटी पुन्हा समोर आल्या आहेत. पिंपरी गाव मतदारसंघातील विद्यानिकेतन शाळेतील बुथ क्रमांक ३०३ येथे काही परप्रांतीयांनी बोगस ओळखपत्रे दाखवून मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ५ जणांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पिंपरी पोलिसांनी या ५ जणांना ताब्यात घेतले आहे. बोगस मतदान होत असल्याची तक्रार आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मतदान अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मराठी मतदारांच्या नावावर परप्रांतीयांनी मतदान केल्याने ही बाब निदर्शनास आली, तसेच आम्ही मतदान केले आहे, असे संबंधितांकडून कबूल करण्यात येत आहे, त्यामुळे पिंपरी गावातील या मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी येथे गर्दी केली आहे.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x