22 November 2024 8:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

बहिणाबाईंच्या कविता आम्ही ऐकल्या आहेत; या शब्दात यातना होण्यासारखं काय आहे? शरद पवार

Pankaja Munde, Dhananjay Munde, Beed, Parli, NCP, Sharad Pawar

मुंबई: बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बंधू-भगिनींमध्ये सुरू असलेल्या वादावर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. ‘धनंजय मुंडे हे पंकजांना बहिणाबाई बोलल्याचं मी ऐकलंय. त्यात वावगं काहीच नाही. बहिणाबाई हा आदरणीय शब्द आहे. या शब्दात यातना होण्यासारखं येण्यासारखं काय आहे,’ असा टोला पवारांनी हाणला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी अर्वाच्च भाषेत टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. या प्रकरणात आता शरद पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. “मी चौकशी केली मी पंकजांचे एक स्टेमेंट पाहिले. त्यात बहिणाबाई असा माझा उल्लेख केला. हा शब्द काही योग्य नाही. बहिणाबाई असा उल्लेख करणं योग्य नाही. हे वक्तव्य मला अतिशय यातना देणारं आहे वगैरे असं त्या म्हणाल्याचं मी ऐकलं. मला वाटतं बहिणाबाई या शब्दामध्ये एक आदर आहे. महाराष्ट्रामध्ये बहिणाबाईंच्या कविता आम्ही लहानपणापासून घोकल्या आहेत. बहिणाबाईंनी अनेक विचार त्यांच्या कवितांमधून मांडले. त्याचा स्वीकार महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राने अगदी आनंदाने केला. त्यामुळे बहिणाबाई या नावातच आदर आहे. त्यामुळे बहिणाबाई या शब्दामुळे यातना का होतात अन् चक्कर का येते हे मला महिती नाही,” असे मत पवारांनी नोंदवले.

धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेख बहिणाबाई असा केला. या शब्दामध्ये काही चुकीचे नाही, असे सांगत पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडेंच्या या भाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानंतर लगेचच याची नोंद घेऊन महिला आयोगाने धनंजय मुंडेंवर कारवाईचे संकेत दिले आहेत. पंकजा-धनंजय वादात राज्य महिला आयोगानं तत्परता दाखवत धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली. पवारांनी याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं. महिला आयोगावर सामान्यपणे सत्ताधारी पक्षाचे लोक असतात. पण आपण भाजपचे प्रतिनिधी म्हणून बसतो हे दाखवायलाच पाहिजे असं काही नाही,’ असा चिमटा पवारांनी काढला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x