22 November 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

किशोर शिंदे भाजपात या; शिंदे म्हणाले 'आधी मेधा कुलकर्णी व मुरली मोहोळ यांना सांभाळा'

Shivsena, Kishor Shinde, Chandrakant Patil, Maharashtra Vidhansabha Election 2019

पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आज मतदान केंद्रावरच प्रतिस्पर्धी उमेदवाराला भारतीय जनता पक्षात प्रवेशाची खुली ऑफर देऊन टाकली. मात्र, वेळेचं बंधन ना पाहता चंद्रकांत पाटलांची ही ऑफर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार किशोर शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत संगळ्यांसमोरच नाकारली. परंतु, खेळीमेळीत दिली गेलेली ही ‘ऑफर’ सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला काहीसा थंड प्रतिसाद पाहायला मिळाला, मात्र अकरानंतर एकूण टक्केवारीत फरक पडताना दिसला. सर्वच क्षेत्रातील आणि राजकारणातील मान्यवर मतदानासाठी बाहेर पडत लोकांना मतदानासाठी आवाहन करताना दिसले. राज्यातील दिग्गज नेते सुद्धा मतदानासाठी उतरले असून उमेदवार आपापल्या मतदारसंघातील मतदान केंद्रांवर फेरफटका मारून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.

कोथरूड विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी देखील आज मयूर कॉलनीमधील जोग शाळेतील मतदान केंद्राला भेट दिली. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार किशोर शिंदे तिथं उपस्थित होते. त्याचवेळी दोन्ही उमेदवार एकेमकांच्या समोर आले. नेमकी यावेळी दोघांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात धावत्या गप्पा झाल्या. मात्र बोलण्याच्या ओघात चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे किशोर शिंदे यांना थेट भारतीय जनता पक्षात येण्याची खुली ऑफर दिली. किशोर शिंदे यांनी देखील चंद्रकांत पाटलांची संभ्रम निर्माण करणारी खेळी अचूक ओळखली आणि क्षणाचाही विचार न करता ही ऑफर सर्वांसमोर धुडकावली आणि आधी माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि मुरली मोहोळ यांच्याकडं थोडं लक्ष द्या, अशी सूचना शिंदेंनी पाटलांना केली आणि सर्वांना एकच हसू आल्याचं पाहायला मिळालं.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x