24 November 2024 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

'हिरकणी'ला थिएटर द्या, एक विनंती करणार, अन्यथा 'खळखट्याक'ला तयार राहा

Marathi Movie Hirkani, MNS Amey Khopkar, Raj Thackeray

मुंबई : एकीकडे लेकरासाठी बुरुज उतरुन आलेली ‘हिरकणी’ आणि दुसरीकडे तिच्या आयुष्यावर आधारित ‘हिरकणी’ हा चित्रपट. हिरकणीप्रमाणेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाटही अवघड झालेली दिसत आहे. बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ‘हाऊसफुल ४’ मुळे ‘हिरकणी’ला चित्रपटगृह मिळण्यात अडथळे उभे राहत आहेत. त्यामुळे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने पुन्हा खळ्ळखट्यॅकचा इशारा दिला आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ हा मराठी चित्रपट उद्या म्हणजेच २४ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या निमित्ताने विशेष मेजवानी यानिमित्ताने मिळणार आहे. परंतु शुक्रवारी ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने हिरकणी चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत आहेत.

‘हिरकणी’ला चित्रपटगृह मिळावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आज चित्रपटगृह मालकांची भेट घेणार आहेत. मराठी चित्रपटाला चित्रपटगृह मिळावी, तो आमचा हक्क आहे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. मराठी चित्रपटाला स्क्रीन्स मिळाल्या नाहीत तर खळखट्याक होईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

अभिनेता प्रसाद ओक याने ‘हिरकणी’चे दिग्दर्शन केले आहे. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या चित्रपटात हिरकणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. लेखक आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर याने हिरकणीची कथा कथा-पटकथा लिहिली आहे. २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या हाऊसफुलमध्ये अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनन, पुजा हेगडे, क्रिती खरबंदा, नवाजुद्दीन सिद्दीकी, चंकी पांडे, शरद केळकर, राणा डुगुबट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे बजेट तब्बल ७५ कोटी रुपये इतके आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x