29 April 2025 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 30 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | ऑटो कंपनीचा मल्टिबॅगर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK
x

नाशिक: लष्कर भरतीच्या ६३ जागांसाठी २० हजार तरुण; भीषण बेरोजगारीचं वास्तव

Indian Army Recruitment, LIC vacancy

नाशिकः नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये लष्कराच्या भरतीसाठी तब्बल ३० हजार तरुण दाखल झाले आहेत. देवळाली कॅम्प येथील ११६ टीए पॅरा बटालियनच्या ६३ जागांसाठी आजपासून लष्कराने भरतीची प्रक्रिया सुरू केलीय. या भरतीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील ९ राज्य व ३ केंद्र शासित प्रदेशातील शेकडो युवक देवळालीत दाखल झाले आहेत.

आज म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील तरुणांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आनंद रोड मैदान ते सह्याद्री नगर जवळील मैदानावर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात ही भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी पोलिस प्रशासनाकडून ३ अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तरुणांची गर्दी वाढल्याने देवळाली कॅम्प परिसरात गोंधळाचे वातावरण असून नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांनी काठी उगारली तरी पळापळ होत असल्याचं चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला. यावेळी अनेक तरुण रस्त्याजवळच्या नाल्यात पडत होते. हजारो युवकांची गर्दी पाहून अखेरीस पहाटे चार वाजताच भरतीसाठी प्राथमिक चाचणी सुरू करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातून आलेल्या तरुणांची भरती होत असून उद्या राजस्थान आणि त्यानंतर अन्य राज्यांची भरती होणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया चार ते पाच दिवस चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या