21 November 2024 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ट्विटरवर राजकीय जाहिरातींना बंदी

Twitter, twitter ceo jack dorsey, Banned on Political Advertising

नवी दिल्ली: अत्यंत कमी वेळात तरूणांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं प्रमुख साधन असलेल्या सोशल मीडियावरील ट्विटरनं आता राजकीय जाहिरातींना बंदी घातली आहे. त्यामुळं ट्विटरवर आता राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. जगभरात ही बंदी घालण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डॉर्सी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

२२ नोव्हेंबरपासून ट्विटरवर राजकीय जाहिराती दिसणार नाहीत. १५ नोव्हेंबर रोजी याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. “इंटरनेटवर जाहिराती खूप ताकदवान आणि प्रभावी ठरतात. व्यावसायिक जाहिरातींपर्यंत ठिक आहे, पण ही ताकद राजकीय जाहिरातींच्या बाबतीत मोठी जोखीम ठरु शकते. राजकारणात या जाहिरातींचा उपयोग मतांवर प्रभाव पाडण्यासाठी होऊ शकतो, याचा परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर होण्याची शक्यता असते”, असं डॉर्सी म्हणालेत.

ट्विटरवरील थ्रेड अचानक डिलीट झाल्यास ते थ्रेड का गायब झाले याचं स्पष्टीकरण ट्विटर देणार आहे. काही आठवड्यात हे फीचर युजर्सना दिसणार आहे. ‘This tweet is unavailable’ च्या जागी ते ट्वीट का गायब झालं याचं कारण दिसणार आहे. ट्विटरवर अनेकदा काही कन्व्हर्सेशनचे ट्वीट गायब झालेले दिसतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती मिळत नाही. ट्वीट गायब झाल्याने लोक गोंधळून जातात. त्यामुळेच ट्विटर आता युजर्सना ट्वीट का गायब झालं यामागचं कारण सांगणार आहे. प्रामुख्याने ट्वीट गायब झाल्यावर ‘This tweet is unavailable’ असं दाखवण्यात येतं. मात्र आता नवं फीचर रोलआऊट झाल्यावर गायब झाल्यामागचं नेमकं कारण आणि तपशील मिळणार आहे.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x