25 November 2024 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

नव्या समिकरणांसाठी हालचाली? पवारांच्या पुढाकारामुळे भाजपाची धाकधूक वाढली

NCP President Sharad Pawar, MP Sanjay Raut

मुंबई: राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष दहाव्या दिवशीही कायम असल्यामुळे एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी एनसीपी’च्या निवडक नेत्यांची शनिवारी पेडर रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पवार हे आज, रविवारी सायंकाळी दिल्लीला जात असून, ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची रविवारीच किंवा सोमवारी भेट घेतील, असे एनसीपी’च्या एका नेत्याने सांगितले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्रीपदही वाटून घेण्याचे ठरले नव्हते या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यानंतर सत्तावाटपाच्या चर्चेचे गाडे रुळावरून घसरले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत रोजच भारतीय जनता पक्षावर शरसंधान साधून, शिवसेनेला अन्य पर्याय खुले असून काँग्रेस-एनसीपी’च्या पाठिंब्यावर सरकार येऊ शकते, असे इशारे देत आहेत. लोकसभा निवडणुकीत युती होण्याआधीही राऊत यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचे भारतीय जनता पक्षाचे धोरण होते. मात्र आता राऊत अतिरेक करीत आहेत, अशी भारतीय जनता पक्ष नेत्यांची भावना असून शिवसेना नेतृत्व त्यांना रोखत नसल्याने भारतीय जनता पक्षानेते नाराज आहेत.

पंतप्रधान मोदी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा नेहमीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय हालचालींचा बारीसारीक तपशील ते रोज घेत आहेत. पण शिवसेनेनं आपल्यावर फक्त टीकाच करायची आणि आपण त्यांचे सर्व लाड पुरवायचे हे यापुढे होणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कृतीतून दिला आहे.

शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये नेमकं काय आणि कधी बिनसलं? दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना, अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद ठरलेलं नव्हतं, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेनं त्याच दिवशी सत्तावाटपाच्या चर्चेसाठी होणारी बैठक रद्द केली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये बोलणीच होऊ शकलेली नाही. मुख्यमंत्री पदाबाबत काय शब्द दिला होता हे अमित शहांकडूनच आता ऐकू, असा शिवसेनेत सूर आहे. या पदाबाबत काय करायचं, महत्त्वाची मंत्रिपदं मिळण्याबाबत घ्यायचा निर्णय हे सगळं काही अमित शहांबरोबरच बोलू, असं सांगत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला वेटिंगवर ठेवलं आहे.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x