22 November 2024 10:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

नोटबंदीला ३ वर्ष पूर्ण; अर्थव्यवस्थेच्या संकटावरून प्रियांका गांधींचा मोदींवर निशाणा

PM Narendra Modi, demonetization, Priyanka Gandhi Vadra

नवी दिल्ली: नोटाबंदी ही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी एक ‘आपत्ती’ असल्याचे सिद्ध करत काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. नोव्हेंबर २०१९ मध्ये नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रियंकाने मोदी सरकारवर हल्ला केला.

त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे, “नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकारने नोटाबंदी सर्व आजारांवरील एक इलाज असल्याच्या सरकारच्या दाव्यावर देखील प्रश्नचिन्हे उपस्थित होतं आहे. नोटबंदी ही एक आपत्ती होती, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था नष्ट झाली. आता या चुकीच्या निर्णयाची जबाबदारी कोण घेणार? “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नेते मंडळींनी देशातील आर्थिक मंदीला नोटाबंदीचा निर्णय जवाबदार असल्याचं यापूर्वीच म्हटलं आहे आणि त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी देखील प्रहार केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी नोटबंदी हा प्रमुख मुद्दा केला होता. काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहनसिंग म्हणाले की उत्पादन क्षेत्रातील विकास दर ०.६ टक्क्यांनी स्थिर राहतो हे त्रासदायक आहे. त्यामुळे स्पष्टपणे सूचित होतं की भारतीय अर्थव्यवस्था अद्याप नोटाबंदीपासून मुक्त झाली नाही आणि त्यात त्वरीत जीएसटी लागू केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#PriyankaGandhi(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x