22 November 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

VIDEO- डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी वकिलांना हात जोडून विनंती केली होती तरी...

Tishajari Court, Delhi Police, dcp north monika bhardwaj

नवी दिल्ली: तिसहजारी कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये डीसीपी मोनिका भारद्वाज आपले हात जोडून वकिलांना शांततेची विनवणी करताना दिसत आहेत, परंतु वकिलांचा कळप अंगावर धावून आला आणि जाळपोळ सुरूच ठेवली. शेकडो वकील डीसीपी मोनिका भारद्वाज आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांना पाठीमागे ढकलताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराचा एक व्हिडिओ कालच समोर आला होता, ज्यात पोलिस अधिकारी मोनिका भारद्वाज काही पोलिसांचं वकिलांपासून संरक्षण करताना दिसत आहेत.

धक्कादायक म्हणजे हिंसाचाराच्या वेळी वकिलांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोपही डीसीपीने केला आहे. एवढेच नव्हे तर या दरम्यान त्यांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हर देखील हिसकावून घेतली गेली आणि त्यानंतर ती अद्याप गायब असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात पोलिस प्रशासनाचे प्रवक्ते अनिल मित्तल यांनी सदर घटनेची एफआयआर’मध्ये नोंद करून घेण्यात आली आहे. दुसरीकडे डीसीपी मोनिका भारद्वाज यांच्याशी झालेल्या चकमकीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या, ‘मी याचा निषेध करते. मी या प्रकरणाची स्वत: दखल घेत आहे आणि बार कौन्सिलसमवेत दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना पत्र देणार आहे.

मागील शनिवारी पार्किंगवरून तिस हजारी कोर्टाच्या आवारात वकील आणि पोलिस यांच्यात वाद सुरू झाला आणि नंतर त्याला हिंसक वळण प्राप्त झालं. वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसाचारात तब्बल २१ पोलिस जखमी झाले होते. तसेच काही वकीलांनाही दुखापत झाली. त्यानंतर शेकडो पोलिसांनी पोलिस मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले आणि त्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

हॅशटॅग्स

#Delhi(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x