22 November 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

अरविंद सावंत यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

Shivsena, MP Arvind Sawant, BJP

नवी दिल्ली: राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून अखेर शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

अरविंद सावंत यांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपूर्द केला. यावेळी ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही. राज्यात ५०-५० चा फॉर्म्युला करण्याचे ठरले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने तसे केले नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक निकालानंतर दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतो आहे असं अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे. या सगळ्या घडामोडींनंतर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली का? असा प्रश्न सावंत यांना विचारण्यात आला. ज्यावर मी राजीनामा दिला आहे त्यातच सगळं आलं असं सूचक वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवलेल्या राजीनाम्याची प्रतही त्यांनी प्रसारमाध्यमांना दाखवली.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x