22 November 2024 12:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

भाजपचे ७ आमदार अजित पवारांच्या संपर्कात तर २ अपक्ष आमदार सेनेच्या संपर्कात

BJP, NCP, MLA

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या गोटात गेलेले २ अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहे. दरम्यान, या २ आमदारांची नावे समजू शकलेली नाहीत. परंतु, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मागितली आहे. सध्याच्या राजकीय हालचाली बघता उद्धव यांना वेळ नाही. त्यामुळे त्या २ अपक्ष आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेला ८ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. आता आणखी २ अपक्ष आमदार शिवसेनेसोबत येण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढण्यात मदत होणार आहे. भारतीय जनता पक्षाला या २ अपक्ष आमदारांनी आधी पाठिंबा दिला होता. परंतु, भारतीय जनता पक्षाला समर्थन देणारे हे आमदार शिवसेनेसोबत येणास तयार झाले आहेत.

दुसरीकडे, सत्तास्थापनेस असमर्थ ठरल्यानंतर भारतीय जनता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या ७ आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले हे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

अजित पवारांना फोन करणारे सातपैकी २ आमदार सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. गरज पडल्यास आम्ही राजीनामा देऊ, असं या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याचं कळतंय. या आमदारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यास भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधित १०५ जागांवर विजय मिळाला होता. मात्र महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून आग्रही भूमिका घेतल्याने भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाशिवआघाडी आकार घेईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. आता तर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाधील तब्बल ७ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले आहे. या आमदारांनी अजित पवार यांना स्वतः फोन केल्याचे वृत्त प्रसार माध्यमाच्या हाती आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x