४ राज्यात भाजपने जनादेशाचा अपमान केला, पण राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही
मुंबई: सध्या राज्यातील सत्तास्थापनेच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा तिळपापड होताना दिसत आहे आणि त्यामुळे ते संतापलेले दिसत असून प्रत्येक गोष्टीत जनादेशाचा आदर भाजप करते असे डोस पाजू लागले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील भाजपच्या या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देण्यात येतं आहे.
शिवसेना-भारतीय जनता पक्षाला जनादेश असल्याने लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं, ही भारतीय जनता पक्षाची इच्छा होती. परंतु, मित्र पक्षाच्या नेत्यांनी जनादेशाचा अनादर केल्यानेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा टोला हाणत भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर राष्ट्रपती राजवटीचं खापर फोडलं.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेला जनादेश हा भारतीय जनता पक्ष-शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम अशा सर्व घटक पक्षांना होता. असं असून देखील सरकार बनविण्यासाठी शिवसेना राजी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!,” असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजभवनवरून बाहेर आल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.
महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे, त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!
– प्रदेशाध्यक्ष श्री @ChDadaPatil pic.twitter.com/tzzZ1IvjFV— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 10, 2019
मुंबई, 12 नोव्हेंबर
राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी आहे.— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 12, 2019
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही आणि त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले. आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 12, 2019
भारतीय जनता पक्ष जनादेशाचा किती आदर करतं याची उजळणी केल्यास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रसार माध्यमांच्यासमोर येण्याचं धाडस होणार नाही. अगदी देशभरातील ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे दाखले द्यायचे झाल्यास, गोव्यामध्ये काँग्रेसला १७ जागा भारतीय जनता पक्षाला १३, मणिपूरमध्ये काँग्रेसला २८ जागा भारतीय जनता पक्षाला २१ जागा, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलला ८० तर जनता दल युनायटेडला ७१ आणि भारतीय जनता पक्षाला ५३ जागा, मेघालयमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ २ तर काँग्रेसला २१ आणि नॅशनल पीपल्स पार्टीला १९ जागा होत्या,” तरी या राज्यांमध्ये घोडेबाजार करत भाजपने सत्तास्थापन केल्याचा इतिहास आहे. अशा अनेक राज्यांमध्ये जनमताचा कौल भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध असताना देखील भारतीय जनता पक्षाने राज्य काबीज केली आणि त्याला अमित शहांची चाणक्यगिरी असं संबोधलं आणि आज हाच पक्ष आणि त्यांचे नेते इतर पक्षांना नैतिकतेचे डोस पाजताना दिसत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी,
स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा : देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/KQjUFH5taw— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 12, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS