मदत तुटपुंजी! काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही: राजू शेट्टी
मुंबई : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. बारामाही पिकांमध्ये फळबागांसह विविध पिकांचा समावेश होतो. अवकाळी पावसामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि नंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जे काही पीक आलं होतं, ते सर्व गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे. त्यांतच त्यांना तातडीच्या मदतीची गरज होती. दरम्यान, आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्यपालांनी मदत जाहीर केली आहे. २ हेक्टरपर्यंक शेती असलेल्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे. खरीपासाठी प्रति हेक्टरी ८ हजार तर फळबागांसाठी १८ हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे राज्यपालांनी केलेली मदत तुटपुंजी असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यपालांच्या या मदतीवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
मदत तुटपुंजी! राज्यपालांना काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही: राजू शेट्टी#सविस्तर_बातमी_येथे_वाचा – https://t.co/8DDf7m8h1V@rajushetti @NCPspeaks @INCMaharashtra @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @ShivSena @mnsadhikrut pic.twitter.com/FFMIUd4C4E
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) November 16, 2019
आम्हाला ट्विटरवर फॉलो करा
राज्यपालांनी जाहीर केलेली तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार; किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांची टीका – #Farmers #FinancialRelieftoFarmers @KisanSabha @INCMaharashtra @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @ShivSena @mnsadhikrut pic.twitter.com/nATVJeDqDt
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahanamaNews) November 16, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार