22 November 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात मनसेचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार

MNS, Maharashtra Navnirman Sena, Raj Thackeray, Amit Thackeray

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात राज्यपालांचं भेटीला पोहोचणार आहेत. राज्यात निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अडथळे येत असल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान महाशिवआघाडीचं सरकार स्थापण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्यातरी सरकार स्थापनेला मोठा विलंब होणार हे निश्चित आहे.

मात्र दुसऱ्याबाजूला राष्ट्रपती राजवट लागली आणि प्रशासकीय यंत्रणा देखील सुस्तावली आहे. अवकाळी पावसामुळे रडकुंडीला आलेला शेतकरी सध्या प्रशासकीय पातळीवर मदत प्राप्त करण्यास प्रचंड अडथळे पार करत असला तरी मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढताना दिसत आहे. तत्पूर्वी राज्यपालांनी जाहीर केलेली तातडीची मदत अत्यंत कमी असल्याने मनसेने ती मदत अजून वाढवावी अशी मागणी करणार असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्यात निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अडथळे येत असल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान महाशिवआघाडीचं सरकार स्थापण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.

मात्र सरकार स्थापनेला थोडा विलंब होत असल्याने अवकाळी पावसामुळे रडकुंडीला आलेला शेतकरी सध्या प्रशासकीय पातळीवर मदत प्राप्त करण्यास त्यांना प्रचंड अडथळे येत आहेत. तसेच राज्यपालांनी जाहीर केलेली तातडीची मदत अत्यंत कमी असल्याने पवार स्वतः यामध्ये केंद्राकडे मदत मागणार आहेत. त्यानुषंगाने, राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x