21 November 2024 10:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सोबत गेलेल्या आमदारांना अजित पवारांनी अंधारात ठेवल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं

MLA Ajit Pawar, Rajbhawan

मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकूणच शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील आत्मविश्वासानंतर देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षाला ३० नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापने सोपं नसल्याचं समोर आलं आहे. तसेच राजभवनात गेलेले राष्ट्रवादीच्या आमदारांना अजित पवारांनी अंधारात ठेवल्याने त्यांच्यावर देखील विश्वास किती ठेवावा अशी चर्चा राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये रंगली आहे. मात्र निवडणूक लागल्यास आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पाडू असं सांगून शरद पवारांनी इशाराच दिला आहे. विशेष म्हणजे पहाटे अजित पवारांसोबत गेलेले काही आमदार शरद पवारांना भेटल्याने भाजपचा प्लॅन फिसकटून सर्वजण पुन्हा राष्ट्रवादीकडे परततील अशी शक्यता आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे अजित पवारांनी सोबत गेलेल्या सर्व आमदारांना राजभवनातील कार्यक्रमावरून अंधारात ठेवलं होतं.

यावेळी पत्रकार परिषदेत जे आमदार शपथविधीला उपस्थित होते त्यातील आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना बुलडाण्याचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, आम्हाला ७ वाजता फोन आला, मी अजितदादांच्या बंगल्यावर गेलो, ८-१० आमदार त्याठिकाणी जमा होते. तिथून आम्हाला सरळ राजभवनावर नेण्यात आलं. राज्यपाल निवासस्थानी जाताना आम्हाला काहीच कल्पना देण्यात आली नाही. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आले. राज्यपाल उपस्थित झाले अन् धक्कादायकपणे शपथविधी झाला. शपथविधी झाल्यानंतर आम्ही ताबडतोब शरद पवारांच्या निवासस्थानी गेलो, त्यांना घडलेला घटनाक्रम सांगितला, आम्ही राष्ट्रवादीसोबतच आहोत. आम्हाला अज्ञात ठेऊन हे सगळं करण्यात आलं असा आरोप त्यांनी केला. तसेच अजितदादांनी फोन केला, राजभवनात जाईपर्यंत आम्हाला काहीही कल्पना दिली नाही, यानंतर आम्ही शरद पवारांसोबत आहोत असं बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे, असं स्टेटस सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअँपवर ठेवलं आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये आता फुट पडल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी जे काही केलं त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार म्हणाले होते. दरम्यान, आपणही यापासून अनभिज्ञ असल्याचं म्हटलं होतं.

काल रात्रीपर्यंत सर्वकाही ठीक असताना अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली होती आणि तुम्ही माझा सोबत आहेत की शरद पवारांसोबत असे प्रश्न विचारले. त्यातील १२ जणांनी त्यांच्यासोबत राजभवनात उपस्थिती दाखवली. मात्र त्याच आमदारांनी पुन्हा शरद पवारांशी संपर्क साधल्याची बातमी हाती आली आहे. त्यामुळे अजित पवारांसोबत असणारे ते आमदार पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आल्यास अजित पवार पुन्हा एकाकी पडतील अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे.

मात्र परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचा फोन एवढ्या महत्वाच्या घडामोडीत बंद असल्याने ते फुटलेल्या आमदारांच्या गटात सामील झाले नाही ना असे राजकीय तर्क लावले जात आहे. मात्र तत्पूर्वी अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्याचं वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x