16 April 2025 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

जस्टीस खन्ना यांनी विचारलं 'त्या आमदारांचा आता पाठिंबा आहे का'...पुढे?

Shivsena, NCP, Congress, BJP, Govt Formation

नवी दिल्ली: भाजपाच्या वतीनं बाजू मांडतांना मुकूल रोहतगी यांनी महत्त्वाचा युक्तीवाद केला. ५४ आमदारांचा आम्हाला पाठिंबा असून, एक पवार आमच्या सोबत आहेत. तर दुसरे आमच्या विरोधात आहेत. त्यांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणंघेणं नाही. राज्यपालांनी पत्रांच्या आधारे निर्णय घेतला आहे,” असं रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं.

भाजपानं सरकास स्थापनेचा दावा केला. राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते अजित पवार यांनी भाजपाला दिलेल्या समर्थनाचं पत्र सॉलिसीटस जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सादर केलं आहे. अजित पवारांनी ५४ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं होतं. ज्यात राज्यातील राष्ट्रपती राजवट हटवण्यात यावी आणि स्थिर सरकार यावं, यासाठी आपण भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पवारांनी या पत्रात म्हटल्याचं तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेलं पत्रही न्यायालयासमोर सादर करण्यात आलं आहे. “माझ्यासोबत १७० आमदारांचा पाठिंबा असून, अपक्षही आमदार सोबत आहेत,” असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. हे पत्र तुषार मेहता यांनी न्यायालयाला वाचून दाखवलं. मात्र त्यानंतर जस्टीस खन्ना यांनी बचाव पक्षाच्या वकिलांना विचारलं की ‘सध्या त्या आमदारांचं मत आणि समर्थाबद्दल काय स्थिती आहे? त्यावर आम्हाला माहित नाही असं उत्तर देण्यात आलं. या एका प्रश्नामुळे भाजपाला सेटबॅक मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत गेलेले आणखी तीन आमदार परतले आहेत. त्यामुळे अजित पवारांसोबत केवळ एक आमदार राहिला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत आणण्यात शिवसेनेनं महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवारांसोबत गेलेले आमदार माघारी फिरल्यानं विश्वासदर्शक ठरावावेळी नेमकं काय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

शरद पवार देखील पूर्णपणे कार्यरत झाल्याने सध्या भारतीय जनता पक्षानेच स्वतःकडे असलेल्या अपक्ष आमदारांना गुजरात किंवा इतर भारतीय जनता पक्षाशासित राज्यात धाडण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे अपक्ष गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनाही तातडीने गुजरातला हलविले आहे. चार ते पाच जणांचे गट करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आणि स्वतंत्र हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांच्याशी संपर्क साधू नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

स्वपक्षाचे १०५ आमदार आणि १५ अपक्ष आमदारांचा पाठिंबा अशी आकडेमोड भारतीय जनता पक्ष प्रथमपासून करीत आहे. दुसरीकडे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादीने सादर केलेल्या पत्रावर मात्र पक्षाच्या ४१ आमदारांच्या सह्या आहेत. यामुळे १३ आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असतील तर भारतीय जनता पक्षाकडील संख्याबळ १३३पर्यंत पोहोचते. त्यातच छोटे पक्ष आणि अपक्ष अशा उर्वरीत १४ पैकी काही आमदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाचा हा डाव पुरता फासल्यात जमा आहे. शरद पवार देखील पूर्णपणे कार्यरत झाल्याने सध्या भारतीय जनता पक्षानेच स्वतःकडे असलेल्या अपक्ष आमदारांना गुजरात किंवा इतर भारतीय जनता पक्षाशासित राज्यात धाडण्याचा हालचाली सुरु केल्या आहेत. कारण आता इतर छोट्या पक्षातील आमदार आणि अपक्ष आमदार देखील फुटले तर भारतीय जनता पक्षाची पंचायत होण्याची शक्यता अधिक आहे. कारण, राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील भारतीय जनता पक्षाच्या गोटातील आमदारांना स्वतःकडे खेचत असल्याचं वृत्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या