22 November 2024 9:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अजित पवारांचा उद्देश राष्ट्रवादी हायजॅक करणं हाच होता? सविस्तर वृत्त

NCP, Sharad Pawar, Ajit Pawar

मुंबई: राज्याच्या राजकारणात शनिवारी धक्कादायक घडामोडी घडल्या आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे या शपथविधीबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली होती. म्हणजे प्रसार माध्यमांना देखील याची कोणतीही चुणूक लागू दिली नव्हती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांसाठी देखील हा मोठा धक्का होता.

दरम्यान, ज्याअर्थी भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा आपल्याकडे बहुमत नसल्याने शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली याचा अर्थ त्यातारखेपर्यंत अजित पवार भाजपच्या संपर्कात नव्हते. दुसऱ्या बाजूला अजित पवार शांत राहून केवळ नेता निवडीनंतर केवळ भाजपच्या आमदारांच्या स्वाक्षरीच्या यादीची वाट पाहात होते असाच प्राथमिक अंदाज येतो. सध्या जरी स्वतःच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचं आधीच निश्चित केलं होतं असं सांगत असले तरी तसं नसल्याचंच एकूण घडामोडी सांगतात. कारण, अजित पवारांचा स्वभाव ठेवढा बिनधास्त आहे की ते निकालानंतर असा विचार बोलू दाखवू शकत होते. मात्र त्यांची योजना समोर संपूर्ण राष्ट्रवादीच हायजॅक करून शरद पवारांसहित सर्वांना फरफटत भाजपसोबत आणून पक्षात आणि केंद्रात देखील स्वतःचा दबदबा करण्याची योजना असावी ज्याची कल्पना घरातील लोकांना देखील नव्हती.

त्यामुळे आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र हातात येताच त्यांनी स्वतःच थेट भाजपशी संपर्क साधला असावा असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे. त्यानंतर अगदी महाविकासआघाडी राजभवनात बहुमत सिद्ध करण्यासाठी राजभवनला जाणार त्याच दिवसाच्या सकाळी सर्व गुप्त हालचाली करून केवळ प्राथमिक स्तरावर शपथविधी आटपून घेण्यात आला. कारण राष्ट्रवादीचे सर्वच ५४ आमदार शरद पवारांना अंधारात ठेवून राजभवनात आणणं अशक्य होतं, तसेच अजित पवारांसारखे जयंत पाटील, छगन भुजबळ आणि इतर अनेक वरिष्ठ नेते पक्षात असल्याने ते निव्वळ अशक्य होतं. त्यामुळे शपथविधी झाला म्हणजे सर्वकाही ठरलं आहे आणि राष्ट्रवादीचा हाच छुपा मनसुबा होता असं भाजपच्या धुरांदरांनी आखलेल्या षढयंत्रात ते सामील झाले आणि त्याचा केवळ तोच आटापिटा असल्याचं दिसतं जे त्यांना भाजपने ठरवून दिलं आहे.

बारामतीच्या कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी देखील ते हेच रडगाणं गात असल्याचं वृत्त आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं एक महिनाआधीच भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता असं अजित पवार कार्यकर्त्यांच्या माथी मारत आहेत. याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेत्यांच्या बैठकीही झाल्या होत्या. मात्र आता हे सगळे नेते मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं अजित पवार कार्यकर्त्यांना सांगून स्वतःची सुटका करून घेत आहेत. मात्र इतका धक्कादायक निर्णय घ्याची त्यांची तयारी पहिलीच होती तर असा खुला निर्णय त्यांनी महिनाभर आधीच घेतला असता, मात्र त्यावेळी त्यांना गटनेता आणि आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र हातात नसल्याने शांत पणे बैठकांना हजेरी लावत होते असाच निष्कर्ष निघतो.

निवडणुकीपूर्वी एक पत्रकार परिषदेत भाजपवर बँक घोटाळ्याचा आरोपावरून तोंडसुख घेताना, भावनिक होत डोळ्यात अश्रू आणणारे अजित पवार आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्रं हातात येताच भाजपच्या प्रेमात पडले. त्यात पार्थ पवारांचं राजकीय भविष्य सुरु होण्याआधीच मातीत मिळालं ते देखील पुढच्या भविष्यासाठी डोकेदुखी होतीच. त्यामुळे एकाबाजूला आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांची मुलं पुढे जात असताना पार्थ पवार सुरुवातीलाच राजकारणाच्या बाहेर फेकले गेले होते आणि त्यांच्या मनात शिवसेनेविषयी आणि शिवसेनेने यापूर्वी केलेल्या विखारी टीकेमुळे त्यांचा शिवसेनेनेवर राग होता जो त्यांनी इतकं मोठं टोकाचं पाऊल उचलत संपूर्ण राष्ट्रवादीच हायजॅक करण्याची योजना आखली होती असंच म्हणावं लागेल.

सभागृहात गुप्त मतदान झाल्यास आपण जिंकणारच असा विश्वास अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर आजही व्यक्त करत आहेत, मात्र खुलं समर्थन करण्याची कोणाचीही हिम्मत नाही हे देखील ते अप्रत्यक्ष मान्य करतात. त्यांच्या ट्रॅपमध्ये राजकीय जीवनात मोठी प्रतिमा उभी करण्याची संधी आलेले धनंजय मुंडे देखील फासले हे विशेष म्हणावे लागेल, जो निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्याच म्हणावा लागला असता. आता काही ज्येष्ठ नेते मला भेटत आहेत, मला शब्द फिरवायला सांगितला जातोय असं अजितदादा सांगत असले तरी सर्वांना खोट्यात पडण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र आजच्या घडीला अजित पवार यांची एक विश्वासघातकी नेता अशीच प्रतिमा झाली आहे हे नक्की म्हणावे लागेल. ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत हे ९९ टक्के सत्य असलं तरी उरलेला एक टक्का जर भाजपच्या अर्थकारणावर त्यांनी शक्य केला तर त्यांचा उद्दाम स्वभावातून यंत्रणा हाताशी धरून ते राष्ट्रवादी संपवतील किंवा प्रति राष्ट्रवादी पक्षच उभा करतील हे नक्की. मात्र त्यांना अजून शरद पवार उमगलेच नाहीत असं म्हणावं लागेल, कारण जर तसेच असेल तर त्यांचा देखील नारायण राणे होईल अशी शक्यता अधिक आहे, कारण ग्रामीण महाराष्ट्रात लोकं शरद पवारांसाठी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठीच जमतात, अजित पवारांना ऐकण्यासाठी जमतात असा त्यांचा गोड गैरसमज झाला असावा.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x