22 November 2024 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सत्ता स्थापनेबाबत अमृता फडणवीसांची 'ट्विट' ठरणार इंटरटेन्मेन्ट, इंटरटेन्मेन्ट, इंटरटेन्मेन्ट

Devednra Fadnavis, Amruta Fadnavis

मुंबई: राजकारण म्हटलं की नेते मंडळी नेहमीच स्वतःला समाज माध्यमांवरून एखाद्या घटनेवरून प्रतिक्रिया किंवा मत व्यक्त करत असतात. राज्याच्या राजकारणात अनेक मुख्यंमत्री होऊन गेले, मात्र त्यांच्या अर्धांगिनी कधीच झगमगत्या दुनियेत दिसल्या नाहीत. अर्थात याला अपवाद ठरल्या त्या अमृता फडणवीस, ज्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि जीवनशैलीच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदी विराजमान होताच बदलल्याचं पाहायला मिळालं.

ऍक्सिस बँकेत ब्रांच मॅनेजर असलेली व्यक्ती अचानक सेलिब्रेटींच्या’मध्ये कोणत्या ना कोणत्यातरी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिसू लागल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असल्याने त्यादेखील समाज माध्यमांवर कार्यरत झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी देवेंद्र फडणवीस आधी विरोधी पक्ष नेते पदी असताना देखील त्या सर्वसाधारण व्यक्तिमत्वाप्रमाणे वावरताना दिसला. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच त्यांच्या व्यक्तिमत्वात शंभर टक्के बदल झाल्याचं सहज नजरेस पडताना दिसलं. परंतु, विषय एवढ्यावरच थांबला नाही, कारण पतीदेव राजकारणी असल्यामुळे त्यांच्या ट्विट्स देखील एखाद्या राजकरणी व्यक्ती प्रमाणे विषयाप्रमाणे पलटी मारताना दिसल्या. सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत त्यांनी दोन घटनांवर समाज माध्यमांवर ट्विस्ट केले होते आणि या दोन्ही ट्विट्स एखाद्या राजकारण्याला देखील लाजवतील अशा होत्या.

म्हणजे ९ नोव्हेंबरला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा बहुमत नसल्याने आम्ही म्हणजे भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात बसणार अशी घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली तेव्हा अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यात त्या म्हटल्या होत्या, ‘तुमच्या भूमिकेचा मला अभिमान आहे’. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप, महाराष्ट्र भाजप आणि राष्ट्रीय भाजपाला मेन्शन केलं होतं.

मात्र, ज्या पतिदेवांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लक्ष करून बैलगाडीसहित मोर्चा काढून सिंचन घोटाळ्याचे पुरावे असल्याचं सांगत अजित पवारांच्या घोटाळ्याला निवडणुकीतील प्रचाराचा मुख्य मुद्दा केला होता आणि भाषणात चक्की पासिंग, चक्की पासिंग अशी भाषणात खिल्ली उडवली होती, त्या अजित पवारांसोबत २३ नोव्हेंबर तारखेला सकाळी राज्यातील जनता झोपेतून देखील उठलेली नसताना लपून शपथविधी उरकून घेतला, त्यावर त्यांनी पहिल्या ट्विट’सारखे अभिमानाचे मुद्दे बाजूला ठेवत एखाद्या पलटणाऱ्या राजकारण्यासारखं दुसरं ट्विट करत म्हटलं, ‘देवेन्द्रजी आणि अजित पवारजी अभिनंदन! तुम्ही करून दाखवलं’. त्यामुळे त्यांच्या या बदलणाऱ्या भूमिकेतून त्यादेखील राजकारण शिकल्या असंच म्हणावं लागेल. कारण, मध्यंतरी जेव्हा त्यांना एका इंटरव्यू मध्ये काही राजकारण्याबद्दल विचारण्यात आलं होतं, त्यात राज ठाकरे यांच्याबद्दल एकवाक्यात काय म्हणाल असा प्रश्न केला तेव्हा, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी अगदी कलाकारी हावभाव करत उत्तर दिल होतं,’ इंटरटेन्मेन्ट! इंटरटेन्मेन्ट! इंटरटेन्मेन्ट! आणि त्यावेळीच त्यांची परिपक्वता सिद्ध झाली होती.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x