3 December 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

अमित ठाकरे यांचा नवी मुंबई महापालिकेवरील थाळीनाद मोर्चात प्रत्यक्ष सहभाग

MNS, Amit Thackeray, Raj Thackeray, Gajanan kale

नवी मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी आज, गुरुवारी शिवाजी पार्कवर सायंकाळी पार पडणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ घेणार आहेत.

एका बाजूला राज्याच्या राजकारणात या घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आज कार्यकर्त्यांसोबत थाळीनाद मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या मोर्चातील प्रत्यक्ष सहभागाने त्यांनी पूर्णवेळ कार्यरत होण्याचा निर्णय घेतला असावा. नवी मुंबईतील ६५०० कामगारांचे १४ महिन्यांचे वेतन महापालिकेकडे थकीत आहेत ते पैसे कामगारांना मिळवून देण्यासाठी अमित ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत निद्रिस्त प्रशासनाला जागं करण्यासाठी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) खूप आधीच युवासेनेच्या माध्यमातून तसेच अनेक उपक्रमातून लोकांसमोर गेल्याचे सर्वश्रुत आहेत आणि सध्या ते थेट विधानसभेत देखील पोहिचले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे (Raj Thackeray’s son Amit Thackeray) पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली नवी मुंबईत महापालिका कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थाळीनाद आंदोलन केलं. पालिकेतील घनकचरा, मल:निस्सारण, विद्युत, पाणीपुरवठा अशा १७ विविध विभागात कार्यरत असणाऱ्या ६,५०० कंत्राटी कामगारांना त्यांची १४ महिन्यांची थकबाकी (एकूण ९० कोटी रुपये) तसंच घंटागाडी कामगारांना त्यांची संपूर्ण ४३ महिन्यांची थकबाकी न दिल्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयावर थाळीनाद महामोर्चा काढण्यात आला. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते आणि महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

एकाबाजूला अमित ठाकरे यांच्या मोर्चातील प्रत्यक्ष सहभागातून होकारात्मक चित्र असताना, नवी मुंबई आणि बेलापूर’मधील पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकं काय बिनसलं ते अजून स्पष्ट झालेलं नाही. कारण अमित ठाकरे यांचा मोर्चातील सहभाग आधीच निश्चित झालेला असताना मागील दोन दिवसांपासून नवी मुंबई आणि बेलापूर परिसरातील अनेक विभागध्यक्षांनी राजीनामा सत्र सुरु केलं आणि त्याचा स्वतःच प्रचार समाज माध्यमांवर खुलेआम सुरु केला आहे. पक्षाचं नैतृत्व करणाऱ्या राज ठाकरे यांचे चिरंजीव नवी मुंबईत मोर्चमधे सहभाग घेण्यासाठी येणार असल्याचं माहित असताना हे हेतुपुरस्कर केलं गेलं का असा स्थानिक पातळीवर प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

हॅशटॅग्स

#AmitThackeray(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x