24 November 2024 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहणार

Uddhav Thackeray Oath Ceremony, Raj Thackeray, Shivsena, MNS, MahaShivAghadi Govt Formation

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी आज, गुरुवारी शिवाजी पार्कवर सायंकाळी पार पडणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ (Shivsena Chief Uddhav Thackeray oath Ceremony) घेणार आहेत.

देशभरातील राजकारणी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार असले तरी राज ठाकरे यांचं कुटुंब (MNS Chief Raj Thackeray Family) प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं. मात्र राजकारणात एकमेकांवर टीका करणारे ठाकरे कुटुंबीय दुःखाच्या आणि आनंदाच्या क्षणी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांना मोठ्या उपचारांना सामोरं जाण्याची वेळ आली तेव्हा देखील राज ठाकरे यांनाच बाळासाहेबांकडून इस्पितळात धाडण्यात आलं. तर राज यांची कन्या उर्वशी यांना अपघात झाला होता तेव्हा स्वतः रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे इस्पितळात उर्वशी यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते.

अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्याला देखील उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना प्रसार माध्यमांनी एका मुलाखतीत आदित्य ठाकरे यांच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या निर्णयाबद्दल विचारलं असता, राज ठाकरे यांनी त्यात काही चुकीचं नाही किंबहुना आताच्या पिढीला वाटत असेल वेगळं तर त्यात काही चुकीचं नाही आणि आदित्य सुद्धा मला माझा मुलासारखाच आहे असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे राजकारणात दिसणारी कटुता प्रत्यक्ष कौटुंबिक विषयात नाही हेच सिद्ध होतं. त्यामुळे राज ठाकरे हे सहकुटुंब आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x