3 December 2024 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

काँग्रेस केवळ अल्पसंख्यांकांसाठीचा पक्ष नसल्याचा संदेश देण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा: सविस्तर वृत्त

Madhya Pradesh CM Kamal Nath, Congress, Sonia Gandhi, MahaShivAghadi

मुंबई: देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष जरी धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगत असला तरी देशात त्यांची प्रतिमा ही अल्पसंख्यांकधार्जिणी असल्याचं सर्वश्रुत आहे. भारतीय जनता पक्षाने देशात कट्टर हिंदुत्वाच्या मुद्यावर देशभरात पक्षाचा विस्तार केला आहे. दरम्यान, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचं नैतृत्व हे हिंदू विरोधी असल्याचं सात्यत्याने लोकांच्या मनात बिंबवलं आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील राहुल गांधी आणि प्रियांका गांधी (Sonia Gandhi and Rahul Gandhi) यांनी साम्य हिंदुत्वाची भूमिका घेत अनेक मंदिरांना भेटी देत पूजा अर्चना केली होती. मात्र, त्यावर देखील भारतीय जनता पक्षाने केवळ निवडणुकीपुरती हिंदू धर्माचा कळवळा आल्याचं सांगत काँग्रेसला कोंडीत पकडलं. लोकसभा प्रचारावेळी सौम्य हिंदुत्वाची भूमिका घेऊन देखील त्यानंतर काँगेसला लोकसभा निवडणुकीत अपयश आलं. त्यामुळे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारा पक्ष हिंदूंना देखील स्थान देतो हे मतदाराला कसं पटवून द्यायचं याच प्रश्नात काँग्रेसचं नैतृत्व होतं. दरम्यान, देशातील राजस्थान आणि मध्य प्रदेश या हिंदी पट्टयात आणि मोठ्या प्रमाणावर हिंदू मतदार असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसला यश मिळालं आणि काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

मात्र आजही खुलेआम आम्हाला हिंदू देखील हवे आहेत असं बोलण्याची धमक काँग्रेसमध्ये नव्हती आणि त्यासाठी त्यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दात पळवाट शोधली होती, मात्र त्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष यश मिळताना दिसत नव्हतं. त्यामुळे एनडीए’मध्ये फूट पाडून भाजपाचे सहकारी स्वतःकडे खेचणे हाच एकमेव मार्ग काँग्रेसकडे शिल्लक होता. त्यात पहिली संधी काँग्रेसला महाराष्ट्रातून चालून आली. मात्र प्रश्न होता की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हे पटवून देणार कोण की कट्टर हिंदुत्ववादी पक्षाला आम्ही पाठिंबा द्यायला हवा आणि त्यात महत्वाची भूमिका बजावली ती मध्य प्रदेशाचे विद्यमान मुख्यमंत्री कमल नाथ यांनी (Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath) असं वृत्त आहे.

काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता जवळपास संपली होती. महाराष्ट्रतील सारे नेते या बैठकीला होते. तर आमदारांना जयपूरला ठेवण्यात आले होते. अशातच ११ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यास सांगितले. तेव्हाच एका शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना फोन केला. दिल्ली बिहार आणि झारखंडच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस विचारधारेला धक्का पोहोचवण्यास इच्छुक नव्हती. यामुळे काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र दिले नव्हते. यानंतर कमलनाथ यांनी १८ ते २१ नोव्हेंबर या काळात सोनिया गांधी , शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली. यानंतर खरेतर काँग्रेसने शिवसेनेला सत्तेच्या चाव्या देण्याचे मान्य केले. शिवसेनेला पाठिंबा दिल्यास काँग्रेसवरचा अल्पसंख्यांकांसाठीचा पक्ष असल्याचा डाग पुसता येईल, असे जेव्हा सोनिया गांधींना पटले तेव्हा होकार मिळाल्याचे कमलनाथांच्या एका जवळच्या नेत्याने प्रसार माध्यमांना सांगितले. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी कमलनाथ यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचे खास निमंत्रण पाठविले आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x