22 November 2024 9:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले विरूद्ध भाजपचे किसन कथोरे

Congress Leader Nana patole, BJP MLA Kisan Kathore, Assembly Speaker

मुंबई: विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव निश्चित करण्यासाठी लवकरच ते अर्ज दाखल करतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Congress Maharashtra President Balasaheb Thorat) यांनी दिली आहे. त्यानंतर आज विधिमंडळ सचिवांकडे नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे , बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदावरुन कोणताही वाद नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे (BJP MLA Kisan Kathore) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही स्पष्ट केले की विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील. ते म्हणाले, ‘काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी ३-४ नावं सुचवली होती. आम्ही सांगितली की तुम्ही यापैकी कोणतंही नाव निवडा, आमची त्याला हरकत असेल असं म्हटलं होतं.

किसन कथोरे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ८५ हजार ५४३ मतांनी विजयी झाले होते. तर २०१९ लाही ते मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात उभे असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गोटीराम यांचा २६ हजार २३० मतांनी पराभव केला होता. भारतीय जनता पक्षाचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून शेतकी संस्था स्थापन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उल्हासनगरच्या न्यायालयाने दिले होते. धक्कादायक बाब म्हणजे सनदी अधिकारी आर. ए. राजीव आणि काही मृत व्यक्तींच्या नावाचाही यात समावेश आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x