22 November 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

खळबळ! जनतेचे हक्काचे ४० हजार कोटी केंद्राकडे पाठविण्यासाठी फडणवीस ३ दिवस मुख्यमंत्री झाले

BJP Leader Anant Kumar Hegde, Former CM Devendra Fadnavis

बेंगळुरू: ‘तीन दिवसांचे मुख्यमंत्री’ म्हणून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात असतानाच कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे (BJP MP Anant Kumar Hedge) यांनी या संदर्भात नवा गौप्यस्फोट केला आहे. ‘केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते, असा दावा हेगडे यांनी केला आहे.

हेगडे म्हणाले की “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे केंद्राचा ४० हजार कोटींचा निधी होता. जर राज्यात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले असते तर हा निधी त्यांच्याकडे गेला असता.” या निधीचा सरकारने गैरवापर केला असता असे म्हणत हेगडे यांनी तारे तोडले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला हा निधी विकासकामासाठी वापरता येऊ नये म्हणून हे सारे कुभांड रचण्यात आले होते असेही हेगडे म्हणाले. हे पैसे केंद्राकडे वळते करण्यासाठी फडणवीस यांना १५ तासांचा अवधी लागला असे हेगडे म्हणाले. निधी वाचवण्यासाठी हे सर्व राजकीय नाट्य केला असे दावाही त्यांनी केला.

त्याचसोबत ही योजना पूर्वीपासूनच भारतीय जनता पक्षाने बनवून ठेवली होती. शपथ घेतल्यानंतर १५ तासांमध्ये फडणवीसांनी केंद्राचे पैसे ज्याठिकाणी पोहचवायचे होते त्याठिकाणी पाठविले. ही योजना अंमलात आणण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशाप्रकारे फडणवीसांनी केंद्र सरकारचा सर्व पैसा वाचविला असल्याचा खळबळजनक खुलासा त्यांनी अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x