28 April 2025 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या गतीने कमाई होईल; पीएसयू शेअरबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक मालामाल करणार, दिग्गज ब्रोकिंग फर्मने दिले संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा; मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स मालामाल करणार; या अपडेटनंतर तेजीचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL
x

मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील गुन्हे देखील सरकारने मागे घ्यावे: आ. धनंजय मुंडे

Maratha Reservation, Ek Maratha lakh Maratha, NCP, MLA Dhananjay Munde

मुंबई: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र (NCP MLA Dhananjay Munde wrote a letter to Chief Minister Uddhav Thackeray) लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे (Bhima Koregaon Riots).

दरम्यान, भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील (Indu Mill and Bhima Koregaon) आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

दरम्यान आता मराठा आदोलकांवरील गुन्ह्यांच काय असा प्रश्न उपस्थित होत होता. आता हे गुन्हेही मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी अधिकृत मागणी केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या