28 April 2025 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा; मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स मालामाल करणार; या अपडेटनंतर तेजीचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
x

याआधी चौकशी व्यवस्थित न झाल्याने न्या. लोया प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी: हुसेन दलवाई

Congress Leader Hussian daiwai, Justice Loya Murder Case, Union Minister Amit Shah

मुंबई: नागपूर येथील गाजलेले न्या. लोया यांच्या मृत्युप्रकरणी काँग्रेस नेते हुसने दलवाई यांनी मोठी मागणी केली आहे. जस्टीस लोया प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी. लोया यांचा खून कसा झाला याचा नीट तपास झाला पाहिजे. ही चौकशी व्यवस्थित झाली नाही असा आरोप त्यांनी केली आहे. याबाबत हुसैन दलवाई यांनी सांगितले की, न्या. लोया यांच्या खुनाचा तपास नीट केला नाही. त्यांचा खून का झाला? ही चौकशी झाली पाहिजे. या खूनामध्ये दहशतवादी संघटनेने तसेच विशिष्ट विचारधारेचा समावेश आहे. त्यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे १० वर्षापर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावी या विनंतीसह दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. अ‍ॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली होती. आता, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी जस्टील लोया प्रकरणाच्या चौकशींसदर्भात विधान केलं आहे. जर, मागणी असेल आणि गरज असेल तरच लोया प्रकरणाची चौकशी करावी, असे पवार यांनी म्हटलं.

संपूर्ण देशात देशात बहुचर्चित ठरलेलं प्रकरण म्हणजे न्यायमूर्ती लोया प्रकरण म्हणता येईल, ज्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघालं होतं. तत्पूर्वी देशाचे लक्ष लागून राहिलेल्या न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाच्या खटल्यावर सर्वोच न्यायालयाने निकाल देत न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही, असा स्पष्टं निर्णय दिला होता.

न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती. त्या याचिकेवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने निर्णय दिला होता आणि न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही असं स्पष्ट केलं होतं.

१ डिसेंबर २०१४ रोजी न्यायमूर्ती बी.एच.लोयां आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेले होते तेंव्हा तिथं त्यांचा मृत्यू झाला. परंतु कॅराव्हान मॅगेझिननं काही महिन्यांपूर्वी न्यायमूर्ती बी.एच.लोयां मृत्यू संशयास्पद असल्याची बातमी दिली होती आणि देशभर खळबळ उडाली होती. त्यामुळे न्यायमूर्ती बी.एच.लोयांच्या मृत्यूप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एक याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर अंतिम निर्णय देताना सर्वोच न्यायालयाने अंतिम निकाल देत न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार नाही असा स्पष्टं निर्णय दिला. विशेष सीबीआय न्यायाधीश बी.एच.लोयां हे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरच्या खटल्याची सुनावणी करत होते त्यामुळे हा विषय देशभरात चर्चेला आला होता.

देशात आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्याने निष्पक्ष चौकशी होतं नसल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. मात्र ज्या महाराष्ट्रात सदर घटना घडली होती तिथे आता भाजप सत्तेतून पायउतार झाली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैत्रुत्वात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याने सदर प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी केली जाण्याची मागणी डोकं वर काढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येते आहे. त्यात पवारांनी असं विधान करून सूचक इशारा दिल्याचं म्हटलं जातं आहे.

जस्टीस लोया प्रकरणाबाबत मला जास्त माहिती नाही, मी केवळ वर्तमानपत्रात काही लेख वाचले आहेत. हे लेख वाचल्यानंतर, या प्रकरणाची मूळापर्यंत जाऊन चौकशी केली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रात अनेक लोकांची आहे. माझ्याजवळ यासंदर्भात डिटेल्स माहिती नाही. पण, मागणी होत असेल तर सरकारने याबाबत विचार केला पाहिजे. या चौकशीची मागणी करणारे कुठल्या आधारे मागणी करत आहेत. यामध्ये काय तथ्य आहे, याची चौकशी केली पाहिजे. जर काही आढळलं तर रिइन्व्हेस्टीगेशन करायला पाहिजे. मात्र, काहीच नसेल तर एखाद्याविरुद्ध आरोप लावण्यासाठी असं करणंही चुकीचं आहे, असं मत पवार यांनी जस्टीस लोया प्रकरणावर दिलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या