22 November 2024 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

गुजरात - रोड सेफ्टीच्या नावाने दांडिया करून झाल्यावर शहरांमध्ये हेल्मेट सक्ती हटवली

CM Vijay Rupani, PM Narendra Modi, No Helmet Compulsion

वडोदरा: गुजरातमधील विजय रूपानी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे गुजरातच्या शहरी भागात दुचाकी चालविणाऱ्या लोकांना हेल्मेट घालणे सक्तीचे राहणार नाही. याची अधिकृत घोषणा गुजरात सरकारचे परिवहन मंत्री आर.सी. फलडू यांनी केली. (Chief Minister of Gujarat Vijay Rupani)

या निर्णयाची घोषणा करताना परिवहन मंत्री आर.सी. फलडू म्हणाले की, गुजरातच्या लोकांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत की लोक नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात हेल्मेट लावणं पसंत करत नाहीत आणि ते व्यावहारिक दृष्ट्या तो मुद्दा योग्य वाटतो. सामान्य लोकांच्या तक्रारीनंतर हा मुद्दा राज्य सरकारसमोर मांडण्यात आला. त्यानंतर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करण बंधनकारक राहणार नाही. विशेष म्हणजे हेल्मेटबद्दल सरकारने मोठी जनजागृती केली होती, मात्र त्यानंतर स्वतः सरकारनेच नमतं घेतलं आहे. (No Helmet Compulsion in city area of Gujarat state)

तसेच सप्टेंबर महिन्यात गुजरात सरकारने केंद्र सरकारने पास केलेल्या मोटार वाहन कायद्यात (Amended Motor Vehicle Act) बदल करून लोकांना दिलासा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार हेल्मेटशिवाय १००० रुपयांऐवजी ५०० रुपये दंड आकारला जाईल. याशिवाय सीट बेल्टशिवाय गाडी चालविण्यावर आता १००० रुपयांऐवजी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने केलेल्या कायद्याद्वारे सर्वसामान्यांना होणार्‍या अडचणी लक्षात घेता गुजरात सरकारने या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. वाहनाच्या नवीन नियमांनुसार, वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना पकडले गेले तर रु. ५०० दंड भरावा लागेल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x