23 November 2024 5:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार: मुख्यमंत्री

Dr. Babasaheb Ambedkar, Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई: काल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही मागणी केली होती. आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण वर्षे ज्या चाळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालवली. तिथून जिथे त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला, जिथून ते वर्ल्ड टेबल कॉन्फरन्सला (गोल्मेज परिषदेला) गेले. जिथे त्यांना छत्रपती शाहू महाराज भेटले. त्या खोलीचे व त्या इमारतीचे राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

काल गुरुवारी संध्याकाळपासूनच देशातील कानाकोपऱ्यातून भीमाची लाखो लेकरे चैत्यभूमीकडे येण्यास सुरुवात झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ही अलोट गर्दी दादर स्थानकातून हळूहळू चैत्यभूमीकडे सरकत आहे.

दादरमधील शिवाजी पार्कवर जणू भीमसागर उसळल्याचं चित्रं पाहायला मिळत आहे. झालं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनानेही जय्यत तयारी केली असून शिवाजी पार्कवर सर्व सोयी -सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. ३ डिसेंबरपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत. यंदाच्या वर्षी चैत्यभूमीवर गर्दीचा उच्चांक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील महत्वाचे सत्याग्रह आणि आंदोलनं म्हणावी लागतील.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x