16 April 2025 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
x

भुजबळांना भेटल्यानंतर खडसे पवारांच्या भेटीला; भाजपवर ओबीसी नेत्यांचा राजकीय बॉम्ब पडणार?

OBC Leader, BJP Pankaja Munde, Eknath Khadse, Girish Mahajan

मुंबई: भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

भाजपाचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी पोहोचले आहेत. एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. एकनाथ खडसे हे भाजपा नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत आल्याची चर्चा होती. पण त्याऐवजी ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

मागच्याच आठवडयात त्यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना पराभूत करण्यात आल्याचा आरोप केला होता. दुर्देवावे बहुजन समाजाला जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न होतोय असे देखील म्हटले होते. तत्पूर्वी, मला जाणीवपूर्वक छळण्यात आलं. मंत्रिमंडळातून बाहेर काढताना जगाला न पटणारे आरोप केले. दाऊदच्या बायकोशी संबंध जोडले. विधानसभेला तिकीट नाकारलं. शिवाय मुलीला तिकीट देऊन स्वत:च्या पक्षातील लोकांनी जाणीवपूर्वक पाडले,” असा हल्लाबोल भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला.

त्यानंतर काल कर्नाटक एक्सप्रेसनं ते दिल्लीसाठी रवाना झाले आणि आज सकाळी दिल्लीत पोहचले आहेत. एकनाथ खडसे हे पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले असल्याचं पेरण्यात आलं असलं तरी ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच भेटून मोठा राजकीय भूकंप करण्यास असल्याचं वृत्त आहे. स्वतः फडणवीस मुख्यमंत्री विदर्भातील असताना देखील भाजपाला विदर्भात मोठा राजकीय फटका बसला आहे. त्यात मराठवाड्यात देखील पंकजा मुंडेंसारख्या दिग्गज नेत्या पराभूत झाल्या असून मराठवाड्यात देखील भविष्यात मोठे राजकीय फटके बसून, उत्तर महाराष्ट्रात देखील भाजप खिळखिळी करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी आखात असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे मोठ्या राजकीय बाता करणारे उत्तर महाराष्ट्रातील भाजप नेते गिरीश महाजन देखील स्वतःच्या मतदासंघापुरते मर्यादित असल्याचं निकालानंतर स्पष्ट झाल्याने भाजपमध्ये अंतर्गत चिंता वाढल्याचं वृत्त आहे.

 

BJP Senior leader Eknath Khadse meet NCP President Sharad Pawar over BJP OBC leaders issue

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या