21 November 2024 8:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मी कांदा खात नाही, तुम्ही सुद्धा खाऊ नका' हे त्यांचे अर्थव्यवस्थेबद्दलचे ज्ञान: शिवसेना

Saamana Editorial, Shivsena, Chief Minister Uddhav Thackeray, PM Narendra Modi, MP Sanjay Raut

मुंबई: महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात रोज राजकीय खटके उडताना दिसत आहेत. त्यात कालच्या कर्नाटकातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं, परंतु त्यावेळी भारतीय जनता पक्षाने ज्या ५ राज्यात जनमत धुडकावलं ते सामान्य लोकसांपासून दडवलं आणि त्याबद्दल वृत्त प्रसिद्ध होताच पुन्हा चिडीचूप झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सामना मुखपत्रात शिवसेनेने अर्थव्यवस्थेच्या दुरावस्थेवरून भाजपाला लक्ष केलं आहे.

अर्थव्यवस्था म्हणजे त्यांच्या दृष्टीने शेअर बाजाराचा ‘सट्टा’ झाला आहे. निर्मला सीतारामन या अर्थमंत्री आहेत, पण अर्थकारणात त्यांचे योगदान काय? ‘‘मी कांदा खात नाही, तुम्ही खाऊ नका’’ हे त्यांचे ज्ञान. आपल्या मुठीत राहणारे अर्थमंत्री, रिझर्व्ह बँक गव्हर्नर, अर्थ सचिव, नीती आयोगाचे अध्यक्ष राज्यकर्त्यांना हवे आहेत व हेच अर्थव्यवस्थेच्या आजाराचे मूळ आहे अशा शब्दात शिवसेनेने मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर रोखठोक टीका केली आहे.

देशाची अर्थव्यवस्था देशपातळीवर कशी काम करते यापेक्षा राज्याच्या पातळीवर कशी काम करते याचे ज्ञान संबंधित तज्ज्ञ व्यक्तींना नाही. त्यामुळे त्यांनी आखलेला कार्यक्रम अर्थव्यवस्थेसाठी सुसंवादी नाही, असे रघुराम राजन सांगतात ते योग्यच आहे. आपली अर्थव्यवस्था ‘आजारी’ आहे, पण मोदी सरकार तेही मान्य करायला तयार नाही. आपली अर्थव्यवस्था तळमळताना आणि तडफडताना दिसत आहे. आम्ही फक्त चिंता व्यक्त करू शकतो, असं म्हणत शिवसेनेनं केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपदकीयमधून देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, काल शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचे एकत्र स्नेह भोजन ४ डिसेंबर रोजी आयोजीत करण्यात आलं होत. या स्नेह भोजनावेळी खासदार श्रीनिवास पाटील आणि अरविंद सावंत यांचा सत्कारही करण्यात आला होता. या स्नेह भोजनावेळी सर्व खासदारांच्या आग्रहाखातर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडद्यामागील सत्तासंघर्षाचा थरारक अनुभव सांगितला. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील विश्वासाचा धागा अतूट आणि मजबूत ठेवण्याची कामगिरी संजय राऊत यांनी कशी पार पाडली. याचा वृत्तांत स्वत: संजय राऊत यांनीच खासदारांसमोर जाहीर केला.

 

Indian Economy is Stock Trading for Modi Govt Says Shivsena in Saamana Editorial

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x