21 November 2024 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पेटा संघटनेच्या 'पेटातील' ज्ञान, दुधापेक्षा बिअर आरोग्याच्या दृष्टीने उत्तम

Peta Beer, Peta Milk

मुंबई: मद्य किंवा मद्यार्काचे सेवन हे आरोग्यास घातक असते, असे सर्वसाधारणपणे सांगितले जाते. परंतु ‘दुधापेक्षा बिअर आरोग्याच्या दृष्टीने बरी’ असल्याचा धक्कादायक दावा ‘पीपल ऑर दि एथिकल ट्रिटमेंट ऑफ एनिमल्स’ (पेटा) या संघटनेने केला आहे.

लहान मुलांना दररोज किमान दोन ग्लास दूध पिणे हे अनेक घरांतून अनिवार्य केले जाते. दुधातून मिळणाऱ्या पोषणमूल्यांमुळे असा आग्रह धरला जातो. मात्र, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेने नव्याने केलेल्या एका अभ्यासात या पारंपरिक सिद्धांताला हादरा दिला आहे. या अहवालानुसार, बिअर हे मद्यार्क असलेले पेय आहे, ज्यामध्ये आश्चर्यकारकरीत्या काही आरोग्यदायी गुण आहेत. बार्ली, गहू, मका, तांदूळ अशा धान्यांपासून बिअर तयार केली जाते. यामध्ये ९० टक्के पाणी, सोल्युबल फायबर, कॅल्शिअम, लोह आणि अनेक पोषकतत्त्वे असतात. बिअर अँटीऑक्सिडण्टदेखील आहे. हाडांची ताकद वाढवण्यासाठी बिअरचा होणारा उपयोग सर्वज्ञात आहे. या तुलनेत दुधाच्या सेवनामुळे ह्रदयरोग, स्थौल्य, मधुमेह व कॅन्सर यांसारखे आजार होतात. लॅक्टोज पचवण्याची क्षमता हरवून बसण्यासारखे विकारही दुधामुळे होऊ शकतात.

विशेष करून बिअर म्हटलं की लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. मात्र याच बिअरचे शरीराला अनेक फायदे असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात बिअर पोटासाठी अत्यंत लाभदायी असल्याचं म्हटलं आहे. काय आहे वैज्ञानिकांचा दावा आणि बिअरचे फायदे काय आहेत पाहा. बिअर पोटाच्या आतड्यांमधील किटाणुंना नष्ट करण्याचं काम करते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर बिअर पित बसाल. बिअर घेण्याचेही काही नियम पाळायला हवेत तरच त्याचा शरीराला योग्य फायदा होऊ शकतो.

तत्पूर्वी ऍमस्टरडॅम युनिवर्सिटीतील प्राध्यापकांनी एक शोधपत्रकात बिअर प्यायल्यानं शरीराला फायदा होत असल्याचा दावा केला आहे. प्राध्यापक एरिक क्लासेन यांच्या म्हणण्यानुसार स्ट्राँग बिअरमध्ये असे प्रोबायोटिक माइक्रोब्स आहेत जे आपल्या शरीरासाठी फायद्याचे असतात. स्ट्राँग एका बिअरला साधारण दोन वेळा फरमेंट केलं जातं. तर साधारण बिअर तयार करताना एकवेळाच फरमेंटची प्रोसेस केली जाते. प्रोबायोटिक पेय तयार करणाऱ्या कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या सेमीनारमध्ये प्राध्यापक सांगत होते. फरमेंटेशन दोन वेळा करण्यासाठी बिअरमध्ये यीस्टचा वापर केला जातो पेय त्यामुळे स्ट्राँग होण्यास मदत होते. या प्रक्रियेमध्ये एक असं ऍसिड बिअरमध्ये तयार होतं जे शरीरातील आतड्यांमध्ये असणाऱ्या हानिकारक बॅक्टेरियांना नष्ट करतं.

मात्र राज्यातील सद्यस्थितीवर बोलायचे झाल्यास उद्या या संशोधनाचे भलतेच परिणाम दिसतील आणि तळीराम रोजचा धिंगाणा घालतील. कारण, नाशिक : राज्य सरकारने दुकाने व आस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमिट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाइन शॉप व चित्रपटगृहे उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा दिला आहे. नवीन नियमानुसार रात्री दीड वाजेपर्यंत परमिट रूम बिअर बार उघडे ठेवता येणार असून, रात्री १० वाजता बंद होणाऱ्या वाइन शॉपला दीड तास अधिक कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

राज्यपालांच्या आदेशाने शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने राजपत्र प्रसिद्ध करून याची माहिती खुली केली आहे. पूर्वी रात्री १२ वाजेपर्यंत बिअर बार व परमिट रूम उघडे ठेवण्यास कायद्याने अनुमती देण्यात आली होती, तर मद्यविक्रीची दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवता येत होती. त्यातही अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून स्थानिक पोलिसांकडून परमिट रूम, वाइन शॉप चालकांवर दंडुकेशाही करून वेळेपूर्वीच आस्थापने बंद करण्यास भाग पाडले जात होते. मुळात शासनाने परमिट रूम, बिअर बार, वाइन शॉप चालकांच्या परवाना शुल्कात दुप्पट वाढ केली असताना त्यात बंदचा कालावधी, पोलिसांच्या जाचामुळे परवडत नसल्याची भावना आस्थापना चालकांकडून व्यक्त केली जात होती. त्याचा विचार करून शासनाने नवीन नियम लागू केले आहेत. नवीन आदेशानुसार महापालिका क्षेत्रात परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्कापार्लर, डिस्कोथेक आणि ज्या-ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री केले जाते ते सकाळी साडेअकरा वाजता उघडण्यात येतील व रात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील, तर नगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सकाळी ११ वाजता उघडतील व रात्री साडेबारा वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे हे असली संशोधनं आणि सरकारी नियम भलतंच काही उदयास आणतील अशी भीती व्यक्त झाल्यास चुकीचं वाटायला नको.

 

Peta Association says Beer is More Healthier than Milk for Human.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x