23 November 2024 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरेंचं नाव निश्चित; पण भाजपचा विरोध?

Balasaheb Thackeray, Shivsena, Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg, CM Uddhav Thackeray

मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम गतिमान झालेले नसले तरी त्याच्या नामकरणावरून निर्माण झालेला वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव मोडीत काढत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याची घोषणा लकरच केली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रानी दिली.

सुमारे ५६ हजार कोटी रूपये खर्चाच्या आणि मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांंत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदननिर्बंध, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यमंतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.

दरम्यान, मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपने या महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

समृद्धी महामार्ग प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काही आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. तेव्हाच महामार्गाच्या नामांतरावरुन युतीत वाद होण्याची चिन्हं निर्माण झाली होती.

तत्पूर्वी २०१८ मध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होताच विरोध सुरू झाल्याने नामकरणाचा मुद्दा तापण्याचे संकेत मिळाले होते. वेगळ्या राज्यासाठी आंदोलन करणाऱ्या विदर्भवाद्यांनी ठाकरे यांचे नाव देण्यास विरोध केला होता.

शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने विदर्भासाठी काहीच केले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भाचा विकास करण्याचे आणि तो न झाल्यास वेगळे राज्य करण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सेनेच्या एकाही नेत्याने त्याचे पालन केले नाही. सेना नेत्यांची नावे मुंबई, पुण्याकडेच शोभतात. सरकारमध्ये हिंमत असल्यास पुण्याच्या सदाशिवपेठेला ठाकरे यांचे नाव द्यावे, असे आव्हान विदर्भवादी व्ही-कॅन संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मुकेश समर्थ यांनी दिले होते.

 

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg will be Named After Shivsena Maestro Balasaheb Thackeray

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x