19 April 2025 11:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

नागरिकत्व सुधारणा विधेयक: मोदी सरकारची राज्यसभेत संख्याबळामुळे परीक्षा

Loksabha, Rajyasabha, CAB Bill in Parliament, Winter Session, Amit Shah, NRC

नवी दिल्लीः बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला असून, ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात आंदोलने तीव्र झाली आहेत. लोकसभेत भारतीय जनता पक्षाच्या सोबत शिवसेना, जेडीयू, बीजेडी आणि पूर्वोत्तर राज्यातील काही लहान पक्षांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केलं.

मात्र आता मोदी सरकारची खरी कसोटी राज्यसभेत आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदू, जैन, इसाई, शीख, बौद्ध आणि पारसी समाजाच्या नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. या विधेयकातून मुस्लिम समाजाला बाहेर ठेवण्यात आलं आहे. त्यावरुनच राज्यसभेत या विधेयकाची कसोटी लागणार आहे. काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे.

राज्यसभेत एकूण सदस्यसंख्या २४५ इतकी आहे. सध्या पाच जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्यसभेची सध्याची सदस्यसंख्या २४० इतकी आहे. त्यामुळे सर्व खासदार उपस्थित राहिले तर बहुमताचा आकडा १२१ वर येईल. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेत ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्या हिशेबाने राज्यसभेतील बहुमताचा आकडा १२१ इतका आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष ८३, बीजेडी ७, एआयएडीएमके ११, अकाली दल ३, शिवसेना ३, जेडीयू ६, वायएसआर काँग्रेस २, एलजेपी १, आरपीआय १ आणि ४ नामांकित खासदार आहेत.

दुसरीकडे विरोधकांकडे काँग्रेसचे ४६, टीएमसी १३, सपा ९, वाम दल ६, डीएमके ५, आरजेडी ४ एनसीपी ४, बसपा ४, टीडीपी २, मुस्लिम लीग १, पीडीपी २, जेडीएस १, केरळ काँग्रेस १ आणि टीआरएस ६ असे मिळून एकूण १०० खासदारांचं संख्याबळ विरोधकांकडे आहे.

दरम्यान, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी रात्री लोकसभेत मोठ्या बहुमताने पारित झाले. काही दिवसांपूर्वी सत्तावाटपावरून भारतीय जनता पक्षाशी असलेली युती तोडणाऱ्या शिवसेनेनेसुद्धा या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला. मात्र लोकसभेत या विधेयकाचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेने वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहे.

 

Winter Session of Parliament after Loksabha approval Modi government Need Approval of Upper House Rajyasabha

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या