22 November 2024 11:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

शिवसेना गद्दार आहे, स्वबळावर लढलो असतो तर...पुढे काय म्हणाले पियुष गोयल?

MahaVikas Aghadi, Union Leader Piyush Goyal, BJP, Shivsena, NCP, Congress

नवी दिल्ली: भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं १९९०-२०००मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत. प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो, असा आरोपही पीयूष गोयल यांनी केला आहे. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात मुलाखती दरम्यान ते बोलत होते.

त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावरही भाष्य केलं आहे. आम्ही युती म्हणून लढलेल्या २८८ पैकी १६४ जागा जिंकलो. भारतीय जनता पक्षानं १०५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रात आम्ही ६५-७० टक्के मतं मिळवून विधानसभेत पोहोचलो. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. जर भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले आहेत. शिवसेना कालपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होती, त्यांच्यासोबतच जाऊन बसली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला कोणतीही दूरदृष्टी किंवा ध्येयधोरणं नाहीत. त्यामुळे देशाला या सरकारनं नुकसानच होणार आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षालाच विजय मिळालेला आहे, इतर तिन्ही पक्षांचा पराभव झालेला आहे. शिवसेनेच्या अरविंद सावंतांसाठी मी गल्लीबोळात जाऊन प्रचार केला होता, दक्षिण मुंबईतली जनता शिवसेनेला मतं देऊ इच्छित नव्हती. आम्हाला त्यावेळी माहिती नव्हतं की, हे लोक गद्दारी करतील. शिवसेनेनं आपल्या सिद्धांतांशी फारकत घेत महाराष्ट्रात सरकार बनवलं. आता ते स्वतःला हिंदू सम्राट म्हणायलाही घाबरतात, असंही केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अधोरेखित केलं आहे.

तत्पूर्वी जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात,जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात,त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते,याचे उदाहरण कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे.जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेला जनादेश हा भारतीय जनता पक्ष-शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम अशा सर्व घटक पक्षांना होता. असं असून देखील सरकार बनविण्यासाठी शिवसेना राजी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!,” असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजभवनवरून बाहेर आल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.

तसेच राज्यातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अवघ्या साडेतीन दिवसात पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा चांगलेच संतापलेले होते, जनादेशाचा अनादर करण्याचं काम शिवसेनेनं केलं आहे. विचारधारा आणि युतीधर्माच्या विरोधात त्यांनी काम केलं आहे. शिवसेनेचा एकही आमदार असा नाही ज्यांनी त्यांच्या बॅनरवर फोटो लावून मतं मागितली नाही, आदित्य ठाकरेंनी तेचं केलं असा अमित शहांनी टोला लगावला होता.

महाराष्ट्रातील राजकीय लढाईत पीछेहाट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवारांनी भारतीय जनता पक्षावर डाव उलटवला अशी चर्चा असतानाच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या घडामोडींवर मौन सोडलं आहे. ‘अजित पवार हे एनसीपी पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते असल्यानं भारतीय जनता पक्षानं त्यांच्यावर विश्वास ठेवला होता,’ असं अमित शहा यांनी सांगितलं होतं.

 

Union Minister Piyush Goyal called Shivsena Gaddar in Interview over MahaVikas Aghadi Government Formation in Maharashtra

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x