22 November 2024 2:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

विखेंची नगरमध्ये ताकद नव्हती; सर्व १२ जागा जिंकू म्हणत ३ जिंकल्या: राम शिंदे

MLA Radhakrushna Vikhe Patil, Former MLA Ram Shinde

नाशिक: महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला होता. रोहित पवार यांना १३५८२४ तर भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांना ९२४७७ मते मिळाली. राेहित पावर यांचा तब्बल ४३,३४७ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांना ५ वर्ष तरी घरी बसावं लागणार हे निश्चित झालं. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी पहिल्याचा दणक्यात भाजपच्या एका मंत्र्याला पराभूत करून घरी बसवला होतं. सध्या कर्जत-जामखेडमधील रोहित पवारांचा वाढता राजकीय आवाका पाहता राम शिंदेंना पुढच्या दुसराच मतदारसंघ शोधावा लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे राम शिंदे देखील संतापलेले दिसतात.

आमदार रोहित पवारांनी राज्याचे मंत्री राम शिंदे यांना आव्हान दिले होते. राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यांच्यासाठी ही निवडणूक पहिल्यापासूनच आव्हानात्मक आणि चर्चेची ठरली. सध्या भारतीय जनता पक्षाचं सरकार देखील गेलं असून भाजपने विभागनिहाय बैठक सुरु केल्या आहेत आणि त्याचाच भाग म्हणून उत्तर महाराष्ट्राची देखील बैठक नाशिकमध्ये पार पडली आणि तिथे देखील राम शिंदेंचा राग दिसून आला.

‘अहमदनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पराभवाला काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जबाबदार आहेत. ते ज्या पक्षात जातात, तिथं खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानिकारक वातावरण निर्माण करतात,’ असा थेट आरोप माजी मंत्री व कर्जत-जामखेडचे भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे.

राम शिंदे म्हणाले, ‘नगरमध्ये भारतीय जनता पक्षाचे ५ आमदार होते. विखे आणि पिचड आल्यानंतर ती संख्या सातवर गेली होती. त्यात आणखी वाढ होणं अपेक्षित होतं. पण निवडणुकीनंतर ती तीनपर्यंतच मर्यादित राहिली. नगर जिल्ह्यातील जागा १२-० नं जिंकू असं विखे म्हणत होते. त्यांची काही फार ताकद होती, असं नाही. पण जी काही होती, त्याचा काहीही फायदा झालेला नाही. उलट अनेकांचा सूर त्यांच्या विरोधात आहे. ते जिथं जातात, तिथं वातावरण बिघडवतात.’

दरम्यान, आजच नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार आशिष शेलार यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधत नागरिक सुधारणा कायदा आणि शिवसेनेच्या भूमिकेवरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. देशहितासाठी भारतीय जनता पक्ष तडजोड करायला तयार आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखववा. शिवसेनेनं काँग्रेसच्या भितीमुळे आपली भूमिका बदलू नये. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे देशाचं हित आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी हे विधेयक स्वीकारावं. सरकार वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेनेसोबत राजकीय तडजोडीसाठी तयार असल्याचं मत भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केलं.

 

Web Title:  Radhakrishna Vikhe Patil is Responsible For loss of BJP in Ahmednagar Assembly election 2019 says Former Minister Ram Shinde

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x