22 November 2024 6:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अडवाणींनी पाकिस्तानचे जनक महंमद अली जीना यांना धर्मनिरपेक्ष म्हटलं अन 'ब्रँड-मोदी'? सविस्तर

Lalkrishna Advani, Founder of Pakistan Muhammad Ali Jinnah

नवी दिल्ली: पाकिस्तानचे जनक महंमद अली जीना यांना मुस्मिांची संख्या अधिक असलेले परंतु, धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवे होते, या आपल्या विधानाचा भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुनरूच्चार केला होता. पात्यानंतर त्यांना पक्षाध्यक्ष पद सोडावे लागले होते.

जीना यांच्याबाबतीत हे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगत अडवाणी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. २००५ मध्ये त्यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्यात जीना यांना धर्मनिरपेक्ष संबोधल्यामुळे गदारोळ उडाला होता. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांनी ताशेरे ओढले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती. अखेर त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. पाकिस्तानचे पत्रकार एम. जे. अकबर यांच्या ‘टिंडरबॉक्स-द पास्ट अँड फ्युचर ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या वाक्याचा पुनरूच्चार केला होता.

लोकसभेत विरोधी पक्षनेते असताना अडवाणी यांनी पाकिस्तान भेटीत ४ जून २००५ रोजी महंमद अली जीना यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यानंतर संघाचा चरफडाट झाला होता, मात्र जिना यांच्याविषयीच्या वक्तव्यावर अडवाणी नंतरही ठाम राहिल्याने, ते संघाच्या काळ्या यादीत गेले. त्यावेळचे सरसंघचालक सुदर्शन यांचा तो सूर पुढे नवनियुक्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यांतूनही उमटत होता.

नंतरच्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवानंतर अडवाणी यांना थेट बाजूला न करता, त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडावे अशी व्यूहनीती करण्यात आली. जानेवारी २०१० मध्ये अडवाणी यांच्या जागी सुषमा स्वराज यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. याच दरम्यान पक्षाचे नेतृत्वही नितीन गडकरी यांच्याकडे आले आणि पक्षात नवनेतृत्वाचा जमाना सुरू करण्याच्या संघाच्या इच्छेची फळे दिसू लागली. त्यानंतर २००९ पासूनच अडवाणींनसहित भाजपच्या सर्व नेत्यांना अंधारात ठेवून संघाने २०१४मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ‘ब्रँड मोदी’ उभा करण्यास शिस्तबद्ध सुरुवात केली होती. त्यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे असे सर्वच नेते नियोजनबद्ध वापरून ‘ब्रँड-मोदी’ बद्दल देशभर वलय निर्माण करण्यात आलं आणि आपण केवळ वापरले जाणार आहोत याची साधी कल्पना देखील या मोठ्या अनुभवी नेत्यांना २०१४ पर्यंत आली नाही हे विशेष म्हणावे लागेल.

 

Web Title:  When BJP Senior Leader Lalkrishna Advani was call Founder of Pakistan Muhammad Ali Jinnah A Secular Leader

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x