22 November 2024 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

लवकरच राजकीय भूकंपाचे आठवलेंकडून संकेत, पण कसा ते त्यांना सुद्धा माहित नाही

Union Minister Ramdas Athawale, MahaVikasAghadi govt, CM Uddhav Thackeray

मुंबई: नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यातच राज्यात राजकीय पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचे विधान सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र नेमका भूकंप कसा शक्य आहे ते देखील त्यांना माहित नसल्याचं दिसलं आणि त्यामुळे केवळ कोणाच्यातरी सांगण्यावरून राजकीय वातावरण दूषित करण्याऱ्या टीममध्ये ते देखील असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या नाट्यमय राजकीय उलथापालथीनंतर सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह घटक पक्षांचे असे महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आलेले आहे. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली आहे.

आठवले म्हणाले, ‘महाराष्ट्रात हे दोन महिने भूकंपाचे आहेत. एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा झाला. आता कोणाचा होणार आहे, ते आपण पाहणार आहोत. मात्र, कोणता-ना-कोणता भूकंप होण्याची शक्यता आहे, असे आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

Web Title:  Union Minister Ramdas Athawale Said Possibility of Political Earthquake in Maharashtra Again Within Two Months

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x