24 November 2024 4:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

ब्रिटिशांची ४ वेळा माफी मागणारे सावरकर तरुणांचे आदर्श होऊ शकत नाहीत; भाजप आ. राणेंचं ते ट्विट

MLA Nitesh Rane, Savarkar

मुंबई: नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपूरात विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपाने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

काल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेवरुन शिवसेनेला सुनावले आहे. फडणवीस यांनी महापुरुषांचा आदर करण्यासंदर्भात सौदेबाजी सुरु आहे का असा सवाल शिवसेनेला केला आहे. यावरुन आता फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “आम्ही गांधी आणि नेहरूंना मानतो, म्हणून तुम्ही सावरकरांना माना?‬ ही कुठली सौदेबाजी आहे?‬,” असा सवाल फडणवीस यांनी शिवसेनाला केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरूद्ध विधान परिषदेत निंदाव्यंजक प्रस्ताव विरोधी पक्षांनी दाखल केला आहे. सदर प्रस्ताव स्वीकारण्यासारखा आहे अथवा नाही यावर सभापती निर्णय घेणार आहेत. परंतु, या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र भारतीय जनता पक्ष वेगळ्याच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, वीर सावरकरांवर सडकून टीका करणारे आमदार नितेश राणे आता त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सभागृहात महाविकास आघाडीला धारेवर धरणार आहेत आणि यापूर्वी देखील आमदार निलेश राणेंवर काँग्रेसने टीका करत भाजपाला खडे बोल सुनावत सावरकर प्रेम म्हणजे निव्वळ डोंगीपणा असल्याचं म्हटलं होतं. तसेच आ. नितेश राणे यांनी ४ डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं की, ब्रिटिश साम्राजाची चार वेळा माफी मागणारे सावरकर तरुणांच्या कोणत्याही पिढीचे आदर्श होऊ शकत नाहीत.

 

Web Title:  MLA Nitesh Rane Twit Made in December 2015 against Veer Savarkar May Throw BJP in Trouble

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x