22 November 2024 4:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

नागपूर: भाजपने विधानसभेत एकही जागा न दिलेल्या शहरांमध्ये शिवसेनेची पक्षबांधणी

Shivsena, Nagpur Rally, Chief Minister Uddhav Thackeray

नागपूर : शिवसेना काय आहे ते सगळ्या देशाला ठाऊक आहे, आम्ही कोणताही बुरखा पांघरलेला नाही. आम्ही धर्मांतर केलेले नाही. आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, अशी टीका करतानाच हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावणार्‍यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव घेता दिला. त्या पक्षाने २०१४ साली युती तोडली होती. त्यानंतरही आम्ही हिंदूच होतो.शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याबाबत आपण कटीबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.

नागपूर शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार आणि स्वागतासाठी व्यासपीठावर एकच गर्दी झाली होती. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने नागपूर, नाशिक, पुणे आणि नवी मुंबईत एकही जागा शिवसेनेला सोडली नव्हती. मात्र शिवसेनेच्या नैत्रुत्वात सरकार स्थापन होताच पक्षाने याच शहरांमधील पक्ष विस्तारावर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना हात घातला. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री झाल्यावर मी शिवसैनिकांना भेटत आहे. मी कुटुंबप्रमुख म्हणून आलो आहे. हे आव्हान मोठं आहे. अजून प्रश्न तेच आहे. आम्ही हिंदुत्ववादीच आहोत. असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

“आज वीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन भाजपाने गोंधळ घातला. शिवसेनेचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला. तुम्ही आम्हाला आमच्या वचनांची आठवण करुन देत आहात त्याची काहीही गरज नाही आमचा काही स्मृतीभ्रंश झालेला नाही” असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. एवढंच नाही तर “कुठे आहेत अच्छे दिन हे विचारल्यावर तुमची बोबडी का वळते?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray Addressed The shiv sena Party Rally at Nagpur.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x