20 November 2024 9:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | 5000 ची SIP करून व्हाल डबल करोडपती, 5 वर्षांत अनेक पटीने वाढेल गुंतवणूक - Marathi News KPI Green Share Price | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, यापूर्वी 10390% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: KPIGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 1050 रुपये टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS IRB Infra Vs BHEL Share Price | IRB इन्फ्रा आणि BHEL सहित हे 8 शेअर्स 63% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: BHEL Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 1 कोटी - BOM: 530305 Home Loan | पगारदारांनो, 25 ऐवजी 13 वर्षांत फेडाल गृहकर्ज; पहा झटपट लोन फेडण्याचा सुपर फॉर्म्युला, पैसा वाचवा - Marathi News NMDC Share Price | मल्टिबॅगर शेअरवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC
x

शहांचं अभिनंदन! लोकांचं मंदी, महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यात ते यशस्वी

MNS Chief Raj Thackeray, CAB 2019

पुणे: सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सध्या देशात आर्थिक मंदीचं वातावरण आहे. अजून आपल्याला मंदीचा सामना करायचा आहे. देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरुन नागरीकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी सारखे मुद्दे समोर आणले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हे करुन दाखवलं असे राज ठाकरे म्हणाले. आधारकार्ड मतदानासाठी चालू शकते मग नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी आधारकार्ड का चालू शकत नाही? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. आधारकार्डासाठी लोकांना तासनतास रांगेत उभं केलं त्याचा उपयोग काय? असा सवाल राज यांनी केला.

नागरिकत्व कायद्याचं भारतीय जनता पक्षाने देखील राजकारण करू नये आणि राजकीय पक्षांनी विनाकारण राजकारण करू नये, स्थानिक मराठी मुस्लिम कधीच आंदोलन करत नाही. इथल्या लोकांच्या चिंता आधी मिटवा, बाहेरून आलेल्या लोकांसंदर्भात पोलिसांना माहिती आहे. पण पोलिसांचे हात बांधलेले असल्यानं ते कारवाई करू शकत नाही. बाहेरच्या लोकांना पोसण्याची गरज नाही. बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या लोकांना हाकललं पाहिजे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x