22 April 2025 1:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH
x

काँग्रेस व सुशिक्षित अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत: नरेंद्र मोदी

Protest against CAB 2019, PM Narendra Modi

नवी दिल्ली: देशातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी एकदा सुधारित नागरिकत्व कायदा वाचावा आणि समजून घ्यावा. राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत शिकले सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून पसरवण्यात आलेली डिटेन्शन कॅम्पची अफवा खोटी आहे. बदनामी करणारी आहे. देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

काही राज्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्यांना राज्यांना मोदींनी सुनावलं. मोदी म्हणाले, “काही राज्यांनी आता एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यास विरोध केला आहे. मात्र, त्यांनी बोलण्याआधी समजून घ्यायला हवं. त्यांनी हा कायदा राज्यातल्या अधिकारातील आहे की नाही याविषयीराज्यांच्या कायदेसल्लागारांशी चर्चा करावी. म्हणजे तोंडावर पडणार नाहीत,” असा उपरोधिक टोला मोदी यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. हे विरोधक आपल्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. खोटी विधाने, फेक व्हिडिओ आणि चिथावणीखोर भाषणे यांनी दिली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये भ्रम निर्माण करून स्फोटक वातावरण तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

दिल्ली विधानसभेच्या अनुषंगानं बोलताना मोदी म्हणाले, “कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणं काम केलं नाही. आम्ही काम करत होतो, तर त्यात आडकाठी आणण्याचं काम ते करत होते. पण, त्यांच्याकडून काहीही साध्य झालं नाही. कारण, समस्या तशाच ठेवणं, हे आमच्या संस्कारात नाही. दिल्लीतील २००० व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्ट्य आहे,” असेही मोदी म्हणाले.

 

Web Title:  PM Narendra Modi slams Congress Party over Protest against CAB 2019.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या