22 April 2025 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

मोदी म्हणाले काँग्रेसने समाज माध्यमांवर फेक व्हिडिओ पसरवले; अन भाजप नेत्यांनी? सविस्तर वृत्त

PM Narendra Modi, Fake Video on Social Media, CAB 2019

नवी दिल्ली: देशातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी एकदा सुधारित नागरिकत्व कायदा वाचावा आणि समजून घ्यावा. राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत शिकले सवरलेले अर्बन नक्षलवादी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांकडून पसरवण्यात आलेली डिटेन्शन कॅम्पची अफवा खोटी आहे. बदनामी करणारी आहे. देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. हे विरोधक आपल्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. खोटी विधाने, फेक व्हिडिओ आणि चिथावणीखोर भाषणे यांनी दिली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये भ्रम निर्माण करून स्फोटक वातावरण तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. मात्र काही दिवसांपूर्वी फडणवीसांसहित भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी खोटे व्हिडिओ पसरवून वातावरण बिघडविण्याचा प्रयन्त केला होता आणि ते फॅक्ट-चेक मध्ये सर्व समोर आल्यानं तोंडघशी पडले होते.

काही राज्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा लागू करणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्यांना राज्यांना मोदींनी सुनावलं. मोदी म्हणाले, “काही राज्यांनी आता एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यास विरोध केला आहे. मात्र, त्यांनी बोलण्याआधी समजून घ्यायला हवं. त्यांनी हा कायदा राज्यातल्या अधिकारातील आहे की नाही याविषयीराज्यांच्या कायदेसल्लागारांशी चर्चा करावी. म्हणजे तोंडावर पडणार नाहीत,” असा उपरोधिक टोला मोदी यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. हे विरोधक आपल्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. खोटी विधाने, फेक व्हिडिओ आणि चिथावणीखोर भाषणे यांनी दिली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये भ्रम निर्माण करून स्फोटक वातावरण तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.

दिल्ली विधानसभेच्या अनुषंगानं बोलताना मोदी म्हणाले, “कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणं काम केलं नाही. आम्ही काम करत होतो, तर त्यात आडकाठी आणण्याचं काम ते करत होते. पण, त्यांच्याकडून काहीही साध्य झालं नाही. कारण, समस्या तशाच ठेवणं, हे आमच्या संस्कारात नाही. दिल्लीतील २००० व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्ट्य आहे,” असेही मोदी म्हणाले.

 

Web Title:  Congress Leaders spread fake videos on Social Media says PM Narendra Modi but Modi Ignore about BJP Leaders viral made on Social Media.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या